ब्रेकिंग न्यूज
सावंतवाडी स्थानकाजवळ दुरांतो एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरले      इंडोनेशियात फटाक्यांच्या कारखान्याला आग, २३ ठार, ४३ जखमी      ताजमहालची सफाई करण्यापेक्षा योगींनी आपल्या पक्षातल्या लोकांची कलुषित मने स्वच्छ करावी : असदुद्दिन ओवैसी      महालक्ष्मी एक्स्प्रेस वर मध्यरात्री दरोडा, जेजुरी राजेवाडी स्टेशन येथील घटना, सिग्नल नादुरुस्त करून केली लूट      पर्यटनासाठी आलेल्या स्वित्झर्लंडच्या एका जोडप्याला उत्तर प्रदेशच्या फतेहपूर सीक्रीत एका टोळक्याने केली मारहाण      मुंबै बँकेकडून राधाकृष्ण विखे-पाटील यांना नियमबाह्य कर्ज? विखेंच्या डबघाईस आलेल्या कंपनीला 35 कोटींचं कर्ज.      मुंबई - छेडछाडीच्या भीतीने तरुणीने ट्रेनमधून उडी मारल्याचं प्रकरण, आरोपीला रेल्वे पोलिसांकडून अटक.      चंदू चव्हाण यांना तीन महिन्यांची शिक्षा, एलओसी ओलांडल्याप्रकरणी चंदू चव्हाण दोषी      अमिताभ बच्चन यांच्या अनधिकृत बांधकामास एमआरटीपीची नोटीस      गडचिरोलीतील 1036 गावांनी घेतला नक्षल गावबंदीचा ठराव
...

मुंबई इंडियन्सविरोधात खेळण्याचा विराट संकेत

मुंबई, दि. १२ - खांद्याच्या दुखण्यामुळे आयपीएलपासून आत्तापर्यंत दूर राहिलेला भारताचा कप्तान विराट कोहलीने रॉयल चॅलेंजर्स मुंबई इंडियन्स यांच्यातील १४ एप्रिलच्या सामन्यात मैदानावर उतरणार असल्याचे संकेत दिले आहेत. इंस्टाग्रामवर विराटने एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. त्यात तो जिममध्ये वेटलिफ्टिंग करताना क्लिन अॅन्ड जर्क ड्रील करताना दिसतो आहे. यात विराट वेटस सहजी उचलताना दिसतो आहे त्याने पोस्ट करताना आता मैदानावर उतरण्याची आणखी प्रतीक्षा करू शकत नाही असे लिहिले आहे. पुढे त्याने १४ एप्रिल तारीख टाकून प्रश्नचिन्हही दिले आहे.

क्रिडा जगतात यावरून चर्चा सुरू झाली असून विराट खाद्याच्या दुखण्यातून पुन्हा तंदुरूस्तीकडे जात असल्याचा हा संकेत मानला जात आहे. ऑस्ट्रेलियाविरोधातील तिसर्या कसोटी सामन्यात रांची येथे खेळताना विराटचा खांदा दुखावला होता त्यामुळे धरमशाला येथील चौथी कसोटी तो खेळू शकला नव्हता. अर्थात विराटने तेव्हाच १२० टक्के फिट झाल्याशिवाय मैदानावर उतरणार नाही असे स्पष्ट केले होते.