ब्रेकिंग न्यूज
सावंतवाडी स्थानकाजवळ दुरांतो एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरले      इंडोनेशियात फटाक्यांच्या कारखान्याला आग, २३ ठार, ४३ जखमी      ताजमहालची सफाई करण्यापेक्षा योगींनी आपल्या पक्षातल्या लोकांची कलुषित मने स्वच्छ करावी : असदुद्दिन ओवैसी      महालक्ष्मी एक्स्प्रेस वर मध्यरात्री दरोडा, जेजुरी राजेवाडी स्टेशन येथील घटना, सिग्नल नादुरुस्त करून केली लूट      पर्यटनासाठी आलेल्या स्वित्झर्लंडच्या एका जोडप्याला उत्तर प्रदेशच्या फतेहपूर सीक्रीत एका टोळक्याने केली मारहाण      मुंबै बँकेकडून राधाकृष्ण विखे-पाटील यांना नियमबाह्य कर्ज? विखेंच्या डबघाईस आलेल्या कंपनीला 35 कोटींचं कर्ज.      मुंबई - छेडछाडीच्या भीतीने तरुणीने ट्रेनमधून उडी मारल्याचं प्रकरण, आरोपीला रेल्वे पोलिसांकडून अटक.      चंदू चव्हाण यांना तीन महिन्यांची शिक्षा, एलओसी ओलांडल्याप्रकरणी चंदू चव्हाण दोषी      अमिताभ बच्चन यांच्या अनधिकृत बांधकामास एमआरटीपीची नोटीस      गडचिरोलीतील 1036 गावांनी घेतला नक्षल गावबंदीचा ठराव
...

चॅम्पिअन्स ट्रॉफीच्या सदिच्छादूतांच्या यादीत हरभजन सिंग

मुंबई, दि. १२ - चॅम्पियन्स ट्रॉफी २०१७चा सदिच्छादूत म्हणून भारतीय स्पिनर हरभजन सिंग याची निवड करण्यात आआल्याची घोषणा आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद अर्थात आयसीसीकडून करण्यात आली आहे. एकूण आठ क्रिकेटपटूंची चॅम्पियन्स ट्रॉफी २०१७ साठी सदिच्छादूत म्हणून निवड करण्यात आली असून यामध्ये हरभजन सिंहचा समावेश आहे. यंदाची आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धा जून ते १८ जूनदरम्यान पार पडणार आहे.

चॅम्पियन्स ट्रॉफीच्या आठ सदिच्छादूतांमध्ये हरभजन सिंह याच्यासोबत पाकिस्तानचा शाहिद आफ्रिदी, बांगलादेशचा हबिबूल बशर, इंग्लंडचा इयान बेल, न्यूझीलंडचा शेन बॉण्ड, ऑस्ट्रेलियाचा माईक हसी, श्रीलंकेचा कुमार संगकारा आणि दक्षिण आफ्रिकेचा ग्रॅमी स्थिम यांचा समावेश आहे.

आयसीसी चॅम्पिअन्स ट्रॉफीचा पहिला चेंडू मैदानावर पडण्यासाठी बरोबर ५० दिवस बाकी असतानाच सदिच्छादूतांच्या नावांची घोषणा करण्यात आली आहे. ओवल मैदानावर इंग्लंड आणि बांगलादेश दरम्यान पहिला सामना पार पडणार आहे. २००२चॅम्पिअन्स ट्रॉफीमधील भारतीय संघात सहभागी असलेल्या हरभजन सिंहने आपण सन्मानित झाल्याची भावना व्यक्त केली आहे. भारताने श्रीलंकेसोबत ट्रॉफी शेअर केली होती. एक क्रिकेटर म्हणून अशा महत्वाच्या इव्हेंटसाठी सदिच्छादूत म्हणून माझी नियुक्ती होणे माझ्यासाठी गर्वाची बाब असल्याची प्रतिक्रिया हरभजन सिंहने दिली आहे.