ब्रेकिंग न्यूज
सावंतवाडी स्थानकाजवळ दुरांतो एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरले      इंडोनेशियात फटाक्यांच्या कारखान्याला आग, २३ ठार, ४३ जखमी      ताजमहालची सफाई करण्यापेक्षा योगींनी आपल्या पक्षातल्या लोकांची कलुषित मने स्वच्छ करावी : असदुद्दिन ओवैसी      महालक्ष्मी एक्स्प्रेस वर मध्यरात्री दरोडा, जेजुरी राजेवाडी स्टेशन येथील घटना, सिग्नल नादुरुस्त करून केली लूट      पर्यटनासाठी आलेल्या स्वित्झर्लंडच्या एका जोडप्याला उत्तर प्रदेशच्या फतेहपूर सीक्रीत एका टोळक्याने केली मारहाण      मुंबै बँकेकडून राधाकृष्ण विखे-पाटील यांना नियमबाह्य कर्ज? विखेंच्या डबघाईस आलेल्या कंपनीला 35 कोटींचं कर्ज.      मुंबई - छेडछाडीच्या भीतीने तरुणीने ट्रेनमधून उडी मारल्याचं प्रकरण, आरोपीला रेल्वे पोलिसांकडून अटक.      चंदू चव्हाण यांना तीन महिन्यांची शिक्षा, एलओसी ओलांडल्याप्रकरणी चंदू चव्हाण दोषी      अमिताभ बच्चन यांच्या अनधिकृत बांधकामास एमआरटीपीची नोटीस      गडचिरोलीतील 1036 गावांनी घेतला नक्षल गावबंदीचा ठराव
...

क्रिकेटमध्ये ऑक्टोबरपासून लागू होणार नवे नियम

मुंबई, दि. १२ - ज्या प्रमाणे क्रिकेट खेळण्याच्या प्रकारांमध्ये बदल होत गेले त्याचप्रमाणे त्याचे नियमही बदलले गेले आहेत. क्रिकेटसाठी आता नव्याने नियम तयार करण्यात आले असून आता ऑक्टोबरपासून हे नवे नियम अंमलात येण्याची शक्यता आहेमेलबर्न क्रिकेट क्लब म्हणजेच एमसीसीने हे नवे नियम जाहीर केले असून ऑक्टोबरपासून हे नियम लागू होणार असल्याने क्रिकेटची मजा आणखी वाढणार असल्याचे आहे.

धाव घेताना फलंदाजाने बॅट टेकवता क्रीझ ओलांडली तर त्याला आऊट करता यायचे. कारण क्रीझमध्ये आल्यानंतर बॅट टेकवणे आवश्यक होते. यासाठी अनेक फलंदाजांना बराच त्रास होत होता, ही गोष्ट लक्षात घेऊन नवा नियम करण्यात आला आहे. आता नव्या नियमानुसार फलंदाजाने क्रीझ ओलांडली तरी तो सुरक्षित असेल त्याला बॅट टेकवण्याची गरज नाही.
त्याचप्रमाणे एखाद्या क्रिकेटपटूने गैरवर्तणूक केली तर त्याला त्या सामन्यासाठी किंवा थोड्या वेळासाठी निलंबित करण्याचे अधिकार पंचांना असणार आहे. फुटबॉल खेळातून हा नियम घेण्यात आला आहे.

बॅटची रूंदी, जाडी किती असावी यावर बंधन असणार. बॅट १०८ मिलिमीटर पेक्षा रूंद नसावी आणि त्याची जाडी ६७ मिलीमीटर पेक्षा जास्त नसावी असा नवा नियम करण्यात आला आहे. बॅटची कडा ही ४० मिलीमीटर पेक्षा जास्त नसावी असेही या नवीन नियमात नमूद करण्यात आले आहे. फलंदाजाला जखमी करण्यासाठी क्रीझची मर्यादा ओलांडून गोलंदाज नो बॉल मुद्दाम टाकतात. अशा गोलंदाजांना लगाम लावण्यासाठी देखील नियम बनवण्यात आला आहे. फलंदाजाला जखमी करण्याच्या दृष्टीने नो बॉल मुद्दाम टाकण्यात आला तर तो बिमर समजला जाईल आणि त्या गोलंदाजाला दंडही भरावा लागेल.

हे नवीन नियम तयार करण्यासाठी जी समिती गठीत करण्यात आली होती त्या समितीमध्ये माजी कर्णधार सौरव गांगुली आणि ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पॉन्टींग यांचा समावेश होता.