ब्रेकिंग न्यूज
सावंतवाडी स्थानकाजवळ दुरांतो एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरले      इंडोनेशियात फटाक्यांच्या कारखान्याला आग, २३ ठार, ४३ जखमी      ताजमहालची सफाई करण्यापेक्षा योगींनी आपल्या पक्षातल्या लोकांची कलुषित मने स्वच्छ करावी : असदुद्दिन ओवैसी      महालक्ष्मी एक्स्प्रेस वर मध्यरात्री दरोडा, जेजुरी राजेवाडी स्टेशन येथील घटना, सिग्नल नादुरुस्त करून केली लूट      पर्यटनासाठी आलेल्या स्वित्झर्लंडच्या एका जोडप्याला उत्तर प्रदेशच्या फतेहपूर सीक्रीत एका टोळक्याने केली मारहाण      मुंबै बँकेकडून राधाकृष्ण विखे-पाटील यांना नियमबाह्य कर्ज? विखेंच्या डबघाईस आलेल्या कंपनीला 35 कोटींचं कर्ज.      मुंबई - छेडछाडीच्या भीतीने तरुणीने ट्रेनमधून उडी मारल्याचं प्रकरण, आरोपीला रेल्वे पोलिसांकडून अटक.      चंदू चव्हाण यांना तीन महिन्यांची शिक्षा, एलओसी ओलांडल्याप्रकरणी चंदू चव्हाण दोषी      अमिताभ बच्चन यांच्या अनधिकृत बांधकामास एमआरटीपीची नोटीस      गडचिरोलीतील 1036 गावांनी घेतला नक्षल गावबंदीचा ठराव
...

विराटच्या इन्स्टाग्राम प्रोफाईलचा जगभर बोभाटा

मुंबई, दि. १५ - टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली नेहमीच मैदानावर असो वा मैदानाबाहेर चर्चेत असतो. त्याच्या खेळामुळे असो वा त्याची गर्लफ्रेंड अनुष्का शर्मामुळे असो, विराटची चर्चा होत असते विराटचे इन्स्टाग्रामवरील प्रोफाईल सध्या चांगलेच चर्चेत आहे. विराटने प्रोफाईल पिक्चर बदलले असून, विराटने अनुष्कासोबतचा नवा फोटो ठेवला आहे. जो फोटो इन्स्टाग्रामवर विराटने प्रोफाईल पिक्चर म्हणून ठेवला आहे, तो फोटो युवराज सिंहच्या लग्नातील आहे. युवराजच्या लग्नात विराट आणि अनुष्का सोबत गेले होते.

अनुष्कासोबतचा फोटो पहिल्यांदाच विराटने शेअर केला आहे असे नाही. त्याने यापूर्वी महिला दिनी आई आणि अनुष्काचा फोटो शेअर केला होता. त्यावेळी विराटने माझ्या आयुष्यातील दोन कणखर महिलांना सलाम, असे म्हटले होते. त्याचबरोबर व्हॅलेंटाईन डेलाही विराटने अनुष्कासोबतचा फोटो शेअर केला होता.