ब्रेकिंग न्यूज
सावंतवाडी स्थानकाजवळ दुरांतो एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरले      इंडोनेशियात फटाक्यांच्या कारखान्याला आग, २३ ठार, ४३ जखमी      ताजमहालची सफाई करण्यापेक्षा योगींनी आपल्या पक्षातल्या लोकांची कलुषित मने स्वच्छ करावी : असदुद्दिन ओवैसी      महालक्ष्मी एक्स्प्रेस वर मध्यरात्री दरोडा, जेजुरी राजेवाडी स्टेशन येथील घटना, सिग्नल नादुरुस्त करून केली लूट      पर्यटनासाठी आलेल्या स्वित्झर्लंडच्या एका जोडप्याला उत्तर प्रदेशच्या फतेहपूर सीक्रीत एका टोळक्याने केली मारहाण      मुंबै बँकेकडून राधाकृष्ण विखे-पाटील यांना नियमबाह्य कर्ज? विखेंच्या डबघाईस आलेल्या कंपनीला 35 कोटींचं कर्ज.      मुंबई - छेडछाडीच्या भीतीने तरुणीने ट्रेनमधून उडी मारल्याचं प्रकरण, आरोपीला रेल्वे पोलिसांकडून अटक.      चंदू चव्हाण यांना तीन महिन्यांची शिक्षा, एलओसी ओलांडल्याप्रकरणी चंदू चव्हाण दोषी      अमिताभ बच्चन यांच्या अनधिकृत बांधकामास एमआरटीपीची नोटीस      गडचिरोलीतील 1036 गावांनी घेतला नक्षल गावबंदीचा ठराव
...

श्रीशांतवरील बीसीसीआयची बंदी कायम

नवी दिल्ली, दि. २० - बीसीसीआयने स्पॉट फिक्सिंगमध्ये अडकलेला भारताचा वेगवान गोलंदाज शांताकुमार श्रीशांतने खेळावरील घातलेली बंदी उठवण्यासंदर्भात केलेले अपील फेटाळून लावले असून श्रीशांतने क्रिकेट खेळण्याच्या बंदी विरोधात केरळ न्यायालयात धाव घेतली होती, पण श्रीशांतवरील बंदी हटवणे योग्य नाही अशी बाजू बीसीसीआयने न्यायालयात मांडली.

दिल्लीच्या सत्र न्यायालयाने २०१५ मध्ये स्पॉट फिक्सिंग प्रकरणातून सुटका केली असली तरी बीसीसीआयने अद्याप बंदी का उठवली नाही? असा सवाल उपस्थित करत श्रीशांतने न्यायालयात धाव घेतली होती. बीसीसीआयने श्रीशांतच्या या याचिकेला स्पष्ट विरोध दर्शवला. न्यायालयाने जरी श्रीशांतची मुक्तता केली असली तरी याचा परिणाम बोर्डाच्या प्रशासकीय समितीने घेतलेल्या निर्णयावर अजिबात होणार नाही. बीसीसीआच्या प्रशासकीय समितीने श्रीशांतवर सर्वप्रकारच्या क्रिकेटमध्ये खेळण्यास बंदी घातली आहे.

बीसीसीआच्या प्रशासकीय समितीने दिलेल्या निर्णयानुसार श्रीशांतने क्रिकेट बोर्डाच्या नियमांचे उल्लघंन केले आहे. फिक्सिंग, भ्रष्टाचार, सट्टेबाजी अशा आरोपाखाली तो दोषी आहे. न्यायालयाने जरी त्याच्या सुटकेचा निर्णय दिला असला तरी त्याच्याविरोधातील पुराव्यानुसार तो बीसीसीआच्या नियमांचे उल्लघंन केल्याप्रकरणी तो दोषी आढळतो. त्याच्याविरोधातील बंदी ही कायम राहिल असे बीसीसीआयने सांगितले आहे.