ब्रेकिंग न्यूज
सावंतवाडी स्थानकाजवळ दुरांतो एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरले      इंडोनेशियात फटाक्यांच्या कारखान्याला आग, २३ ठार, ४३ जखमी      ताजमहालची सफाई करण्यापेक्षा योगींनी आपल्या पक्षातल्या लोकांची कलुषित मने स्वच्छ करावी : असदुद्दिन ओवैसी      महालक्ष्मी एक्स्प्रेस वर मध्यरात्री दरोडा, जेजुरी राजेवाडी स्टेशन येथील घटना, सिग्नल नादुरुस्त करून केली लूट      पर्यटनासाठी आलेल्या स्वित्झर्लंडच्या एका जोडप्याला उत्तर प्रदेशच्या फतेहपूर सीक्रीत एका टोळक्याने केली मारहाण      मुंबै बँकेकडून राधाकृष्ण विखे-पाटील यांना नियमबाह्य कर्ज? विखेंच्या डबघाईस आलेल्या कंपनीला 35 कोटींचं कर्ज.      मुंबई - छेडछाडीच्या भीतीने तरुणीने ट्रेनमधून उडी मारल्याचं प्रकरण, आरोपीला रेल्वे पोलिसांकडून अटक.      चंदू चव्हाण यांना तीन महिन्यांची शिक्षा, एलओसी ओलांडल्याप्रकरणी चंदू चव्हाण दोषी      अमिताभ बच्चन यांच्या अनधिकृत बांधकामास एमआरटीपीची नोटीस      गडचिरोलीतील 1036 गावांनी घेतला नक्षल गावबंदीचा ठराव
...

शून्यावर बाद, विराट कोहलीला राग अनावर

कोलकाता,दि. २४ - ईडन गार्डन्सच्या मैदानावर झालेल्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा कर्णधार विराट कोहली पहिल्याच चेंडूत शून्यावर बाद झाला. यानंतर विराटला राग अनावर झाला. त्याने सामनाधिकाऱ्याला बोलावून चांगलंच सुनावलं.

कोलकात्याविरुद्ध झालेल्या या साम्यात बंगळुरुला ८२ धावांनी पराभवाचा सामना करावा लागला. विशेष म्हणजे बंगळुरुचा एकही गोलंदाज दोन अंकी धावसंख्या उभारु शकला नाही. सर्व संघ ४९ धावांवर गारद झाला. फलंदाजी करत असताना एका प्रेक्षकामुळे विराटचं लक्ष विचलित झालं आणि काल्टरच्या चेंडूवर तो बाद झाला. बाद झाल्यानंर पॅव्हेलियनमध्ये जाताच त्याने सामनाधिकाऱ्याला बोलावलं आणि त्या प्रेक्षकाविषयी जाब विचारला.