ब्रेकिंग न्यूज
सावंतवाडी स्थानकाजवळ दुरांतो एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरले      इंडोनेशियात फटाक्यांच्या कारखान्याला आग, २३ ठार, ४३ जखमी      ताजमहालची सफाई करण्यापेक्षा योगींनी आपल्या पक्षातल्या लोकांची कलुषित मने स्वच्छ करावी : असदुद्दिन ओवैसी      महालक्ष्मी एक्स्प्रेस वर मध्यरात्री दरोडा, जेजुरी राजेवाडी स्टेशन येथील घटना, सिग्नल नादुरुस्त करून केली लूट      पर्यटनासाठी आलेल्या स्वित्झर्लंडच्या एका जोडप्याला उत्तर प्रदेशच्या फतेहपूर सीक्रीत एका टोळक्याने केली मारहाण      मुंबै बँकेकडून राधाकृष्ण विखे-पाटील यांना नियमबाह्य कर्ज? विखेंच्या डबघाईस आलेल्या कंपनीला 35 कोटींचं कर्ज.      मुंबई - छेडछाडीच्या भीतीने तरुणीने ट्रेनमधून उडी मारल्याचं प्रकरण, आरोपीला रेल्वे पोलिसांकडून अटक.      चंदू चव्हाण यांना तीन महिन्यांची शिक्षा, एलओसी ओलांडल्याप्रकरणी चंदू चव्हाण दोषी      अमिताभ बच्चन यांच्या अनधिकृत बांधकामास एमआरटीपीची नोटीस      गडचिरोलीतील 1036 गावांनी घेतला नक्षल गावबंदीचा ठराव
...

आयपीएलमध्ये अनसोल्ड इरफानचे पुनरागन

मुंबईदि. २५ - ऑल राऊंडर इरफान पठाणला गुजरात लायन्सने खरेदी केले असून आयपीएलमधून ड्वेन ब्राव्हो जखमी झाल्याने त्याने माघार घेतली असून त्याच्या जागी इरफान पठाणची वर्णी लागली आहे. कोणत्याच संघाने आयपीएलच्या दहाव्या मोसमाच्या लिलावात ५० लाख किंमत असणा-या इरफानला खरेदी करण्यात रस दाखवला नव्हता. इरफानची भावनिक जखम मात्र ड्वेन ब्राव्होला झालेल्या दुखापतीमुळे भरुन निघाली आहे. गुजरात लायन्सची जर्सी घातलेला फोटो इरफानने ट्विटरवर शेअर केला असून सहभागी होण्यास उत्सुक असल्याचे म्हटले आहे.

आतापर्यंत पाच आयपीएल संघांमधून ३२ वर्षीय इरफान पठाण खेळला आहे. यामध्ये चेन्नई सुपरकिंग्ज, दिल्ली डेअरडेव्हिल्स, किंग्स इलेव्हन पंजाब, सनरायझर्स हैदराबाद आणि रायजिंग पुणे सुपरजायंट्स संघाचा समावेश आहे. त्याने १०२ आयपीएल सामन्यांमध्ये ८० विकेट्स आणि १२०.५७ च्या स्ट्राईक रेटने ११३७ धावा काढल्या आहेत. गतवर्षी रायजिंग पुणे सुपरजायंट्सकडून खेळताना मात्र इरफान आपला प्रभाव पाडू शकला नव्हता. तीन सामन्यांमध्ये त्याने फक्त ११ धावा केल्या होत्या, तर एकही विकेट घेण्यात त्याला यश मिळाले नव्हते.