ब्रेकिंग न्यूज
सावंतवाडी स्थानकाजवळ दुरांतो एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरले      इंडोनेशियात फटाक्यांच्या कारखान्याला आग, २३ ठार, ४३ जखमी      ताजमहालची सफाई करण्यापेक्षा योगींनी आपल्या पक्षातल्या लोकांची कलुषित मने स्वच्छ करावी : असदुद्दिन ओवैसी      महालक्ष्मी एक्स्प्रेस वर मध्यरात्री दरोडा, जेजुरी राजेवाडी स्टेशन येथील घटना, सिग्नल नादुरुस्त करून केली लूट      पर्यटनासाठी आलेल्या स्वित्झर्लंडच्या एका जोडप्याला उत्तर प्रदेशच्या फतेहपूर सीक्रीत एका टोळक्याने केली मारहाण      मुंबै बँकेकडून राधाकृष्ण विखे-पाटील यांना नियमबाह्य कर्ज? विखेंच्या डबघाईस आलेल्या कंपनीला 35 कोटींचं कर्ज.      मुंबई - छेडछाडीच्या भीतीने तरुणीने ट्रेनमधून उडी मारल्याचं प्रकरण, आरोपीला रेल्वे पोलिसांकडून अटक.      चंदू चव्हाण यांना तीन महिन्यांची शिक्षा, एलओसी ओलांडल्याप्रकरणी चंदू चव्हाण दोषी      अमिताभ बच्चन यांच्या अनधिकृत बांधकामास एमआरटीपीची नोटीस      गडचिरोलीतील 1036 गावांनी घेतला नक्षल गावबंदीचा ठराव
...

रोहितला ५० टक्के रकमेचा दंड

मुंबई, दि. २६ - मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्माला पंचांच्या निर्णयावर उघड नाराजी व्यक्त केल्याचा फटका बसला आहे. रोहितला या प्रकरणी एका सामन्याच्या मानधनाच्या ५० टक्के रकमेचा दंड ठोठावण्यात आला आहे.

मुंबईला पुण्याविरुद्धच्या सामन्यात अखेरच्या चार चेंडूंत ११ धावांची आवश्यकता होती. त्या वेळी जयदेव उनाडकटने बाहेर टाकलेला चेंडू पंच एस. रवी यांनी वाईड ठरवला नाही. पंचांच्या या निर्णयामुळे नाराज झालेल्या रोहित शर्माने त्यांच्या दिशेने चालत जाऊन आपला निषेध व्यक्त केला. लेग अंपायर नंदकिशोर यांनीही त्या वेळी तिथे जाऊन मध्यस्थी केली. मग पुढच्याच चेंडूवर मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नात रोहित बाद झाला आणि त्याच्या मुंबई इंडियन्सला पुण्याकडून तीन धावांनी हार स्वीकारावी लागली.