ब्रेकिंग न्यूज
सावंतवाडी स्थानकाजवळ दुरांतो एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरले      इंडोनेशियात फटाक्यांच्या कारखान्याला आग, २३ ठार, ४३ जखमी      ताजमहालची सफाई करण्यापेक्षा योगींनी आपल्या पक्षातल्या लोकांची कलुषित मने स्वच्छ करावी : असदुद्दिन ओवैसी      महालक्ष्मी एक्स्प्रेस वर मध्यरात्री दरोडा, जेजुरी राजेवाडी स्टेशन येथील घटना, सिग्नल नादुरुस्त करून केली लूट      पर्यटनासाठी आलेल्या स्वित्झर्लंडच्या एका जोडप्याला उत्तर प्रदेशच्या फतेहपूर सीक्रीत एका टोळक्याने केली मारहाण      मुंबै बँकेकडून राधाकृष्ण विखे-पाटील यांना नियमबाह्य कर्ज? विखेंच्या डबघाईस आलेल्या कंपनीला 35 कोटींचं कर्ज.      मुंबई - छेडछाडीच्या भीतीने तरुणीने ट्रेनमधून उडी मारल्याचं प्रकरण, आरोपीला रेल्वे पोलिसांकडून अटक.      चंदू चव्हाण यांना तीन महिन्यांची शिक्षा, एलओसी ओलांडल्याप्रकरणी चंदू चव्हाण दोषी      अमिताभ बच्चन यांच्या अनधिकृत बांधकामास एमआरटीपीची नोटीस      गडचिरोलीतील 1036 गावांनी घेतला नक्षल गावबंदीचा ठराव
...

बीसीसीआयने थकवले खेळाडूंचे मानधन

नवी दिल्ली, दि. २८ - गेल्या हंगामात १३ कसोटी सामने भारतीय संघाने खेळले असून भारतीय संघाने न्यूझीलंड, इंग्लंड, बांगलादेश आणि ऑस्ट्रेलिया या संघांविरुद्ध दिमाखदार विजय मिळवला. पण टीम इंडियाच्या क्रिकेटपटूंना या विजयी घौडदौडीनंतरही मानधन मिळालेले नाही. भारतीय संघ जगभरातील क्रिकेटपटूंच्या सामनेनिहाय मानधनात अव्वल असून प्रत्येक कसोटीचे १५ लाख रुपये अंतिम अकरामध्ये समावेश असलेल्या खेळाडूला मिळतात. तर अन्य खेळाडूंना लाख रुपये मानधन मिळते. पण या खेळाडूंना गेल्या सहा महिन्यांपासून हे मानधन मिळालेले नाही.

ऐरवी आमच्या खात्यात कसोटी सामना संपल्याच्या दोन महिन्यात मानधन जमा व्हायचे. पण आम्हाला गेल्या सहा महिन्यांपासून मानधनच मिळालेले नाही अशी माहिती टीम इंडियाच्या कसोटी संघातील एका वरिष्ठ क्रिकेटपटूने दिली आहे. सर्वोच्च न्यायालयाने देशांतर्गत कारभारातील अनियमिततेमुळे लोढा समितीची स्थापना केली. बीसीसीआय आणि संलग्न संघटनांना या समितीने केलेल्या शिफारशींची अंमलबजावणी करणे अनिवार्य करण्यात आले.

बीसीसीआयने प्रचंड चालढकलीनंतर शिफारशींचा अंगीकार केला. सर्वोच्च न्यायालयाने बीसीसीआयचा कारभार चालवण्यासाठी प्रशासकीय समितीची नियुक्ती केली होती. कसोटीपटूंना या वादाचा फटका बसला आहे. फेब्रुवारीमध्ये बीसीसीआयमध्ये कोणालाही स्वाक्षरीचे अधिकार नव्हते. त्यामुळे बिलांवर स्वाक्षरी कोण करणार हा संभ्रम होता याकडे बीसीसीआयमधील सूत्रांनी लक्ष वेधले. विद्यमान सचिव अमिताभ चौधरी यांच्याकडेच वेतनसंबंधीचे बिल मंजूर करण्याचे अधिकार आहेत. त्यामुळे मानधन देण्यास विलंब झाला असे सूत्रांचे म्हणणे आहे. तर महिला खेळाडूंनी बीसीसीआयसोबत करारपत्रकावर स्वाक्षरी केली की त्यांनादेखील तातडीने मानधन दिले जाईल असे पदाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.