ब्रेकिंग न्यूज
सावंतवाडी स्थानकाजवळ दुरांतो एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरले      इंडोनेशियात फटाक्यांच्या कारखान्याला आग, २३ ठार, ४३ जखमी      ताजमहालची सफाई करण्यापेक्षा योगींनी आपल्या पक्षातल्या लोकांची कलुषित मने स्वच्छ करावी : असदुद्दिन ओवैसी      महालक्ष्मी एक्स्प्रेस वर मध्यरात्री दरोडा, जेजुरी राजेवाडी स्टेशन येथील घटना, सिग्नल नादुरुस्त करून केली लूट      पर्यटनासाठी आलेल्या स्वित्झर्लंडच्या एका जोडप्याला उत्तर प्रदेशच्या फतेहपूर सीक्रीत एका टोळक्याने केली मारहाण      मुंबै बँकेकडून राधाकृष्ण विखे-पाटील यांना नियमबाह्य कर्ज? विखेंच्या डबघाईस आलेल्या कंपनीला 35 कोटींचं कर्ज.      मुंबई - छेडछाडीच्या भीतीने तरुणीने ट्रेनमधून उडी मारल्याचं प्रकरण, आरोपीला रेल्वे पोलिसांकडून अटक.      चंदू चव्हाण यांना तीन महिन्यांची शिक्षा, एलओसी ओलांडल्याप्रकरणी चंदू चव्हाण दोषी      अमिताभ बच्चन यांच्या अनधिकृत बांधकामास एमआरटीपीची नोटीस      गडचिरोलीतील 1036 गावांनी घेतला नक्षल गावबंदीचा ठराव
...

रैनाची प्रगल्भता, ऋषभ पंतची पाठ थोपटली

मुंबई, दि. ५ - संजू सॅमसन ६१ आणि ऋषभ पंतच्या धडाकेबाज ९७ धावांमुळे दिल्ली डेअरडेव्हिल्सने गुजरात लायन्सवर विकेट्स राखून विजय मिळवला. कोटला स्टेडियमवरच्या या सामन्यात गुजरातनं दिल्लीला विजयासाठी २०९ धावांचं भलंमोठं आव्हान दिलं होतं. पण सॅमसन आणि पंतनं दुसऱ्या विकेटसाठी ६३ चेंडूंत केलेल्या १४३ धावांच्या भागिदारीनं त्या आव्हानातली हवाच काढून घेतली.

ऋषभ पंतचं शतक अवघ्या तीन धावांनी हुकलं. त्यानं ४३ चेंडूंत सहा चौकार आणि नऊ षटकारांसह ९७ धावांची खेळी करून दिल्लीला विजयपथावर नेऊन ठेवलं. सलामीच्या संजू सॅमसननं ३१ चेंडूंत सात षटकारांसह ६१ धावांची खेळी करून दिल्लीच्या विजयात मोलाचा वाटा उचलला.

रैनाची ऋषभ पंतला शाबासकी

ऋषभ पंत ९७ धावांवर आऊट झाला, त्यावेळी ३ धावांनी शतक हुकल्याने तो थोडासा निराश झाला. मात्र त्याचवेळी गुजरातचा कर्णधार सुरेश रैना ऋषभ पंतजवळ येऊन त्याच्या पाठीवर शाबासकीची थाप दिली. रैनाने ऋषभ पंतचं मनोबल उंचावण्यासाठी मैदानावरच त्याच्या खेळीचं कौतुक केलं. ऋषभ पंत झेलबाद झाल्यावर, रैना तातडीने त्याच्याकडे आला. रैनाने ऋषभ पंतच्या हेल्मेटवर आपुलकीने थाप मारली आणि त्याच्या खांद्यावर हात ठेवले.विरोधी संघाचा कर्णधार असला तरी रैनाने प्रगल्भता दाखवून ऋषभचं केलेलं कौतुक नक्कीच भावणारं आहे.