ब्रेकिंग न्यूज
सावंतवाडी स्थानकाजवळ दुरांतो एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरले      इंडोनेशियात फटाक्यांच्या कारखान्याला आग, २३ ठार, ४३ जखमी      ताजमहालची सफाई करण्यापेक्षा योगींनी आपल्या पक्षातल्या लोकांची कलुषित मने स्वच्छ करावी : असदुद्दिन ओवैसी      महालक्ष्मी एक्स्प्रेस वर मध्यरात्री दरोडा, जेजुरी राजेवाडी स्टेशन येथील घटना, सिग्नल नादुरुस्त करून केली लूट      पर्यटनासाठी आलेल्या स्वित्झर्लंडच्या एका जोडप्याला उत्तर प्रदेशच्या फतेहपूर सीक्रीत एका टोळक्याने केली मारहाण      मुंबै बँकेकडून राधाकृष्ण विखे-पाटील यांना नियमबाह्य कर्ज? विखेंच्या डबघाईस आलेल्या कंपनीला 35 कोटींचं कर्ज.      मुंबई - छेडछाडीच्या भीतीने तरुणीने ट्रेनमधून उडी मारल्याचं प्रकरण, आरोपीला रेल्वे पोलिसांकडून अटक.      चंदू चव्हाण यांना तीन महिन्यांची शिक्षा, एलओसी ओलांडल्याप्रकरणी चंदू चव्हाण दोषी      अमिताभ बच्चन यांच्या अनधिकृत बांधकामास एमआरटीपीची नोटीस      गडचिरोलीतील 1036 गावांनी घेतला नक्षल गावबंदीचा ठराव
...

चँपियन्स ट्रॉफीसाठी सोमवारी टीम इंडियाची निवड

मुंबई, दि. ६ - भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय) आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेमध्ये (आयसीसी) वाद सुरु असला तरी चँपियन्स ट्रॉफी क्रिकेट स्पर्धेसाठी टीम इंडिया सहभागी होणार हे निश्चित झाले आहे. सोमवारी या स्पर्धेसाठी टीम इंडियाची निवड करण्यात येणार आहे.

नुकतेच टीम इंडियाच्या नव्या जर्सीचे खेळाडूंच्या अनुपस्थितीत अनावरण करून, आयसीसीला बीसीसीआयने गुगली टाकला; पण काही तासांतच बीसीसीआयचा कारभार चालवत असलेल्या प्रशासकीय समितीने चॅंपियन्स ट्रॉफीसाठी लवकरात लवकर संघाची निवड करा, असा आदेश दिला होता. त्यामुळे आता सोमवारी संघनिवड करण्यात येणार आहे. व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून कर्णधार विराट कोहली संघनिवडीवेळी सहभागी होणार आहे.

संघ निवडण्याची अंतिम मुदत २५ एप्रिल ही असतानाही अजून संघाची निवड का करण्यात आली नाही, अशी विचारणा प्रशासकीय समितीने बीसीसीआयचे सचिव अमिताभ चौधरी यांच्याकडे केली होती. चॅंपियन्स करंडक या स्पर्धेचे आपण गतविजेते आहोत. त्यामुळे आता या स्पर्धेत भारतीय संघ सहभागी होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. जूनपासून इंग्लंडमध्ये ही स्पर्धा सुरु होत आहे.