ब्रेकिंग न्यूज
सावंतवाडी स्थानकाजवळ दुरांतो एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरले      इंडोनेशियात फटाक्यांच्या कारखान्याला आग, २३ ठार, ४३ जखमी      ताजमहालची सफाई करण्यापेक्षा योगींनी आपल्या पक्षातल्या लोकांची कलुषित मने स्वच्छ करावी : असदुद्दिन ओवैसी      महालक्ष्मी एक्स्प्रेस वर मध्यरात्री दरोडा, जेजुरी राजेवाडी स्टेशन येथील घटना, सिग्नल नादुरुस्त करून केली लूट      पर्यटनासाठी आलेल्या स्वित्झर्लंडच्या एका जोडप्याला उत्तर प्रदेशच्या फतेहपूर सीक्रीत एका टोळक्याने केली मारहाण      मुंबै बँकेकडून राधाकृष्ण विखे-पाटील यांना नियमबाह्य कर्ज? विखेंच्या डबघाईस आलेल्या कंपनीला 35 कोटींचं कर्ज.      मुंबई - छेडछाडीच्या भीतीने तरुणीने ट्रेनमधून उडी मारल्याचं प्रकरण, आरोपीला रेल्वे पोलिसांकडून अटक.      चंदू चव्हाण यांना तीन महिन्यांची शिक्षा, एलओसी ओलांडल्याप्रकरणी चंदू चव्हाण दोषी      अमिताभ बच्चन यांच्या अनधिकृत बांधकामास एमआरटीपीची नोटीस      गडचिरोलीतील 1036 गावांनी घेतला नक्षल गावबंदीचा ठराव
...

रिषभ पंतने गमवली विकेट, अनुभवाची कमी

कानपूर, दि. ११ - नजर हटी, दुर्घटना घटीअशी पाटी महामार्गांवर बऱ्याचदा पाहायला मिळते, आणि ही म्हण खुरीसुद्धा आहे. पण फक्त रस्त्यावरच नाही तर खेळाच्या मैदानातही असं घडू शकतं. याचाच प्रतत्य दिल्ली डेअरडेव्हिलसचा धडाकेबाज फलंदाज रिषभ पंतलाही आला१९ वर्षीय रिषभकडे गुणवत्ता ठासून भरली आहे. पण अद्याप अनुभवाची कमी असल्याचं कालच्या सामन्यात दिसून आलं. काल ज्या पद्धतीनं रिषभनं आपली विकेट गमावली ती त्याच्यासाठी नक्कीच धडा शिकवणारी गोष्ट होती

कानपूरच्या मैदानात काल (बुधवार) गुजरातनं दिल्लीसमोर १९६ धावाचं आव्हान ठेवलं होतं. या आव्हानाचा पाठलाग करताना सलामीवीर संजून सॅमसन झटपट बाद झाला. त्यानंतर मैदानात आलेल्या रिषभ पंतकडून संघाला मोठ्या अपेक्षा होत्या. पहिल्याच चेंडूवर चौकार ठोकून त्यानं आशा उंचवल्या देखील. पण दुसऱ्याच चेंडूवर सगळ्या आशा धुळीसही मिळवल्या… 

त्याचं नेमकं झालं असं की, रिषभनं पहिल्या चेंडूवर चौकार ठोकल्यानंतर गोलंदाज प्रदीप सांगवाननं दुसऱ्या चेंडू थोडासा लेग साईडला टाकला. चेंडू रिषभच्या पॅडला लागून स्लीपमध्ये असणाऱ्या रैनाकडे गेला. त्याचवेळी गोलंदाजानं एलबीडब्ल्यूसाठी जोरदार अपील केली. तेव्हा रिषभचं सारं लक्ष त्याच्याकडेच गेलं. पंचानी त्याला नाबाद ठरवलं. त्यावेळी करुण नायर धाव घेण्याच्या तयारीत होता. रिषभनं हात दाखवत त्याला थांबण्याचा इशारा केला. पण याचवेळी स्वत: रिषभ मात्र, क्रिझच्या बाहेर होता. हीच संधी रैनानं साधली. रिषभ क्रिझमध्ये नाही आणि त्याची पाठ आपल्याकडे असल्याचं पाहून रैनानं चेंडू थेट स्टम्पवर मारलाअन् इथंच रिषभचा खेळ खल्लास झाला… 

रिषभनं बॅट क्रिझमध्ये टेकवण्याआधीच रैनानं फेकलेल्या चेंडूनं स्टम्पचा वेध घेतला होता. त्यामुळे पंचांच्या निर्णयाची वाटही पाहता रिषभनं निमूटपणे पॅव्हेलियनची वाट धरली

 रिषभ अशा पद्धतीनं बाद होणं ही काही पहिलीच वेळ नाही. याआधीही तो अशाच पद्धतीनं बाद झाला होता. मागील वर्षी खेळवण्यात आलेला अंडर १९ विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात रिषभ असाच रनआऊट झाला होता. वेस्टइंडिज विरुद्ध सामन्यात सामन्यातील चौथ्याच चेंडूवर रिषभ रनआऊट झाला होता आणि हाच मॅचचा टर्निंग पॉईंटही ठरला होता.
त्यावेळी रिषभ वेगवान गोलंदाजाला क्रिझच्या बाहेर उभा राहून खेळत होता. जोरदार फटका मारण्याचा नादात तो आणखी पुढेही आला. पण चेंडू त्याच्या बॅटला लागला