ब्रेकिंग न्यूज
सावंतवाडी स्थानकाजवळ दुरांतो एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरले      इंडोनेशियात फटाक्यांच्या कारखान्याला आग, २३ ठार, ४३ जखमी      ताजमहालची सफाई करण्यापेक्षा योगींनी आपल्या पक्षातल्या लोकांची कलुषित मने स्वच्छ करावी : असदुद्दिन ओवैसी      महालक्ष्मी एक्स्प्रेस वर मध्यरात्री दरोडा, जेजुरी राजेवाडी स्टेशन येथील घटना, सिग्नल नादुरुस्त करून केली लूट      पर्यटनासाठी आलेल्या स्वित्झर्लंडच्या एका जोडप्याला उत्तर प्रदेशच्या फतेहपूर सीक्रीत एका टोळक्याने केली मारहाण      मुंबै बँकेकडून राधाकृष्ण विखे-पाटील यांना नियमबाह्य कर्ज? विखेंच्या डबघाईस आलेल्या कंपनीला 35 कोटींचं कर्ज.      मुंबई - छेडछाडीच्या भीतीने तरुणीने ट्रेनमधून उडी मारल्याचं प्रकरण, आरोपीला रेल्वे पोलिसांकडून अटक.      चंदू चव्हाण यांना तीन महिन्यांची शिक्षा, एलओसी ओलांडल्याप्रकरणी चंदू चव्हाण दोषी      अमिताभ बच्चन यांच्या अनधिकृत बांधकामास एमआरटीपीची नोटीस      गडचिरोलीतील 1036 गावांनी घेतला नक्षल गावबंदीचा ठराव
...

ऍशेसवर बहिष्कार टाकू शकतात ऑस्ट्रेलियन खेळाडू

सिडनी, दि. १६ (वृत्तसंस्था) - उपकर्णधार डेव्हिड वॉर्नरसह अन्य खेळाडूंनी क्रिकेट ऑस्ट्रेलियाने दिलेल्या धमकीच्या पार्श्वभूमीवर त्याला तोडीस तोड उत्तर देताना या हंगामातील ऍशेस मालिकेवरच बहिष्कार टाकण्याचा खणखणीत इशारा दिला आहे. सध्याच्या प्रस्तावावर ३० जूनपूर्वी स्वाक्षरी केली नाही तर त्यानंतर मानधन रोखण्याचा कटू निर्णय घ्यावा लागेल, असे क्रिकेट ऑस्ट्रेलियाने म्हटले होते. डेव्हिड वॉर्नरसह आघाडीच्या खेळाडूंनी त्यावर कठोर भूमिका घेतली आहे.

ऑस्ट्रेलियन खेळाडूंच्या संघटनेने मागील महिन्यात क्रिकेट ऑस्ट्रेलियाचीपे ऑफरफेटाळून लावली. सध्याची ऑफर म्हणजे क्रिकेट प्रशासकांसाठी विजय, पण, क्रिकेटसाठी पराभव, अशा स्वरुपाचा असल्याची टीका त्यावेळी संघटनेने केली होती. त्यानंतर सदर खेळाडूंची संघटना क्रिकेट ऑस्ट्रेलिया यांच्यात सातत्याने कलगीतुरा सुरु आहे.

आमची क्रिकेट ऑस्ट्रेलियाच्या वाढीव मानधनाची मागणी मान्य करेल, असा मला विश्वास वाटतो. मात्र तसे झाल्यास संघ सोडण्याचा निर्णय घेण्यातही आम्ही गय करणार नाही आणि त्यानंतरच्या परिणामाची आम्हाला चिंताही नसेल, अशा स्पष्ट शब्दात वॉर्नरने आपली भूमिका स्पष्ट केली. आयपीएल सोडण्यासाठी वर्षे कराराची क्रिकेट ऑस्ट्रेलियाची निव्वळ हास्यास्पद होती, असेही वॉर्नर म्हणाला. वॉर्नरचा ३० वर्षीय सहकारी, डावखुरा जलद गोलंदाज मिशेल स्टार्कने देखील बहिष्कार टाकणे हाच योग्य पर्याय असल्याचा यावेळी पुनरुच्चार केला.