ब्रेकिंग न्यूज
सावंतवाडी स्थानकाजवळ दुरांतो एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरले      इंडोनेशियात फटाक्यांच्या कारखान्याला आग, २३ ठार, ४३ जखमी      ताजमहालची सफाई करण्यापेक्षा योगींनी आपल्या पक्षातल्या लोकांची कलुषित मने स्वच्छ करावी : असदुद्दिन ओवैसी      महालक्ष्मी एक्स्प्रेस वर मध्यरात्री दरोडा, जेजुरी राजेवाडी स्टेशन येथील घटना, सिग्नल नादुरुस्त करून केली लूट      पर्यटनासाठी आलेल्या स्वित्झर्लंडच्या एका जोडप्याला उत्तर प्रदेशच्या फतेहपूर सीक्रीत एका टोळक्याने केली मारहाण      मुंबै बँकेकडून राधाकृष्ण विखे-पाटील यांना नियमबाह्य कर्ज? विखेंच्या डबघाईस आलेल्या कंपनीला 35 कोटींचं कर्ज.      मुंबई - छेडछाडीच्या भीतीने तरुणीने ट्रेनमधून उडी मारल्याचं प्रकरण, आरोपीला रेल्वे पोलिसांकडून अटक.      चंदू चव्हाण यांना तीन महिन्यांची शिक्षा, एलओसी ओलांडल्याप्रकरणी चंदू चव्हाण दोषी      अमिताभ बच्चन यांच्या अनधिकृत बांधकामास एमआरटीपीची नोटीस      गडचिरोलीतील 1036 गावांनी घेतला नक्षल गावबंदीचा ठराव
...

भारतीय महिला क्रिकेट संघाची विश्वविक्रमाला गवसणी

नवी दिल्ली, दि. १६ - भारताच्या शिरपेचात आंतरराष्ट्रीय महिला एकदिवसीय क्रिकेटमध्ये विश्वविक्रमी कामगिरी करत महिला संघाने आणखी एक मानाचा तुरा खोवला असून दीप्ति शर्मा आणि पूनम राउत या जोडीने आयर्लंडविरूद्ध झालेल्या सामन्यात चक्क ३२० धावांची भागीदारी केली आहे. ही भागीदारी पहिल्या विकेटसाठी करण्यात आली असून, आंतरराष्ट्रीय महिला एकदिवसीय क्रिकेटमध्ये कोणत्याही विकेटसाठी ही सर्वात मोठी भागीदारी ठरली आहे.

दीप्ती शर्माने भारताच्या वतीने उत्कृष्ट खेळी करत पहिले शतक आणि त्यानंतरचे अर्धशतक वेगाने झळकवले. त्यानंतर ती आपले दुसऱे शतकही पूर्ण करेल अशी जोरदार आशा असतानाच १८८ धावा करून ती बाद झाली. त्यामुळे अवघ्या १२ धावांनी तिचे द्विशतक हुकले. अन्यथा दिप्तीच्या नावावर हाही एक विक्रम ठरला असता. पण दिप्तीने केलेल्या १८८ धावा हा भारतीय महिला क्रिकेटमधील नवा विक्रम ठरला आहेच. परंतू, आंतरराष्ट्रीय महिला क्रिकेटमध्येही हा एक विक्रमच असून, दीप्तीने उभारलेली धावसंख्या ही महिला क्रिकेटमधील सर्वोच्च वैयक्तिक धावसंख्या ठरली आहे.

दीप्तीने उत्कृष्ठ विक्रमी खेळी साकारताना २६ चौकार आणि षटकार ठोकत १६० चेंडूंमध्ये १८८ धावा केल्या. तर, पूनम राउतने १०९ धावांची खेळी करून दीप्तिला चांगली साथ दिली. दरम्यान, १०९ धावांची खेळी करून पूनम रिटायर्ड झाली. दरम्यान, दीप्ती आणि पूनमने उभारून दिलेल्या भक्कम धावसंख्येच्या जोरावर भारताने खेळाडू बाद ३५८ धावा केल्या. ३५९ धावांचा सामना करायला उतरलेल्या आयर्लंडच्या संघाचा भारतीय महिला गोलंदाजांपूढे टीकाव लागला नाही. आयर्लंडचा अख्खा संघ ४० षटकात केवळ १०९ धावांमध्ये गारद झाला.