ब्रेकिंग न्यूज
सावंतवाडी स्थानकाजवळ दुरांतो एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरले      इंडोनेशियात फटाक्यांच्या कारखान्याला आग, २३ ठार, ४३ जखमी      ताजमहालची सफाई करण्यापेक्षा योगींनी आपल्या पक्षातल्या लोकांची कलुषित मने स्वच्छ करावी : असदुद्दिन ओवैसी      महालक्ष्मी एक्स्प्रेस वर मध्यरात्री दरोडा, जेजुरी राजेवाडी स्टेशन येथील घटना, सिग्नल नादुरुस्त करून केली लूट      पर्यटनासाठी आलेल्या स्वित्झर्लंडच्या एका जोडप्याला उत्तर प्रदेशच्या फतेहपूर सीक्रीत एका टोळक्याने केली मारहाण      मुंबै बँकेकडून राधाकृष्ण विखे-पाटील यांना नियमबाह्य कर्ज? विखेंच्या डबघाईस आलेल्या कंपनीला 35 कोटींचं कर्ज.      मुंबई - छेडछाडीच्या भीतीने तरुणीने ट्रेनमधून उडी मारल्याचं प्रकरण, आरोपीला रेल्वे पोलिसांकडून अटक.      चंदू चव्हाण यांना तीन महिन्यांची शिक्षा, एलओसी ओलांडल्याप्रकरणी चंदू चव्हाण दोषी      अमिताभ बच्चन यांच्या अनधिकृत बांधकामास एमआरटीपीची नोटीस      गडचिरोलीतील 1036 गावांनी घेतला नक्षल गावबंदीचा ठराव
...

धावपटू ललिता बाबर विवाहबंधनात अडकली

सातारा, दि. १६ - ऑलिम्पिक स्पर्धेत भारताचे प्रतिनिधीत्व केलेली धावपटू ललिता बाबरच्या नव्या आयुष्याला मंगळवारी सुरुवात झाली आहे. डॉ. संदीप भोसले यांच्यासोबत ललिता लग्नबेडीत अडकली आहे. ललिताचा विवाहसोहळा सातारा येथे मोठ्या थाटामाटात पार पडला. देशभरातील दिग्गज मंडळी वऱ्हाडी म्हणून ललिता आणि डॉ. संदीप भोसले यांच्या विवाह सोहळ्यास उपस्थित होती.

मंगळवारी दुपारी .३५ वाजता साताऱ्यातील यशोदा टेक्निकल कॅम्पसमध्येमाणदेशी एक्स्प्रेसललिता बाबर आणि सोलापूरच्या लिगाडवाडीसारख्या दुष्काळी गावातून उच्चपदस्थ अधिकारी बनलेले डॉ. संदीप भोसले यांचा विवाह थाटात पार पडला. नेहमीस्पोर्ट्स ड्रेसमध्ये झळकणाऱ्या ललिताची नववधू वेशभूषा साऱ्यांनाच भावून गेली. विवाह सोहळ्याच्या व्यासपीठावर केलेल्या डेकोरेशनमधीलऑलिम्पिकचे बोधचिन्हही सर्वांचेच लक्ष वेधून घेत होते.

यावेळी चित्रपट अभिनेत्री अमृता खानविलकर, निर्माता संजय जाधव, माण-खटावचे आमदार जयकुमार गोरे, आमदार शशिकांत शिंदे, आमदार अनिल बाबर, जिल्हा परिषद अध्यक्ष संजीवराजे निंबाळकर, कोकण आयुक्त प्रभाकर देशमुख, जिल्हा परिषद-पंचायत समिती पदाधिकारी, बहुतांश लोकप्रतिनिधी, अधिकारी तसेच सामाजिक-राजकीय कार्यकर्ते मोठ्या उत्साहाने उपस्थिती लावली.