ब्रेकिंग न्यूज
सावंतवाडी स्थानकाजवळ दुरांतो एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरले      इंडोनेशियात फटाक्यांच्या कारखान्याला आग, २३ ठार, ४३ जखमी      ताजमहालची सफाई करण्यापेक्षा योगींनी आपल्या पक्षातल्या लोकांची कलुषित मने स्वच्छ करावी : असदुद्दिन ओवैसी      महालक्ष्मी एक्स्प्रेस वर मध्यरात्री दरोडा, जेजुरी राजेवाडी स्टेशन येथील घटना, सिग्नल नादुरुस्त करून केली लूट      पर्यटनासाठी आलेल्या स्वित्झर्लंडच्या एका जोडप्याला उत्तर प्रदेशच्या फतेहपूर सीक्रीत एका टोळक्याने केली मारहाण      मुंबै बँकेकडून राधाकृष्ण विखे-पाटील यांना नियमबाह्य कर्ज? विखेंच्या डबघाईस आलेल्या कंपनीला 35 कोटींचं कर्ज.      मुंबई - छेडछाडीच्या भीतीने तरुणीने ट्रेनमधून उडी मारल्याचं प्रकरण, आरोपीला रेल्वे पोलिसांकडून अटक.      चंदू चव्हाण यांना तीन महिन्यांची शिक्षा, एलओसी ओलांडल्याप्रकरणी चंदू चव्हाण दोषी      अमिताभ बच्चन यांच्या अनधिकृत बांधकामास एमआरटीपीची नोटीस      गडचिरोलीतील 1036 गावांनी घेतला नक्षल गावबंदीचा ठराव
...

चॅम्पियन्स ट्रॉफीनंतर भारत वेस्ट इंडिज दौऱ्यावर

नवी दिल्ली, दि. १७ - आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीनंतर टीम इंडिया वेस्ट इंडिज दौऱ्यावर जाणार आहे. भारताचा वेस्ट इंडिज दौरा २३ जूनपासून सुरु होईलबीसीसीआयने भारताच्या या दौऱ्याची मंगळवारी घोषणा केली. चॅम्पियन्स ट्रॉफी जून ते १८ जून या कालावधीत खेळली जाणार आहे. वेस्ट इंडिजसोबत भारत पाच वन डे सामने आणि एक टी-२० सामने खेळणार आहे. २३ जून ते जुलै या काळात हे सामने खेळवण्यात येतील.

पहिले दोन वन डे सामने पोर्ट ऑफ स्पेनच्या क्वींस पार्क ओव्हल मैदानावर २३ आणि २५ जून रोजी खेळवण्यात येतील. तर तिसरा आणि चौथा वन डे सामना एंटिगातील सर व्हिव्हियन रिचर्ड्स मैदानावर खेळवला जाणार आहे. अखेरचा आणि पाचवा वन डे सामना जमैकातील सबीना पार्क मैदानात, तर एकमेव टी-२० सामनाही याच मैदानात खेळवला जाईल, अशी माहिती बीसीसीआयने दिली आहे.

आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी नुकतीच टीम इंडियाची निवड करण्यात आली आहे. टीम इंडियात रोहित शर्मा आणि मोहम्मद शमीने पुनरागमन केलं आहे. बीसीसीआयच्या सीनियर निवड समितीच्या नवी दिल्लीत झालेल्या बैठकीत १५ सदस्यीय भारतीय संघाची निवड जाहीर करण्यात आली. चॅम्पियन्स ट्रॉफीत भारताचा पहिलाच सामना पारंपारिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानसोबत होणार आहे. जून रोजी हा सामना होईल.