ब्रेकिंग न्यूज
सावंतवाडी स्थानकाजवळ दुरांतो एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरले      इंडोनेशियात फटाक्यांच्या कारखान्याला आग, २३ ठार, ४३ जखमी      ताजमहालची सफाई करण्यापेक्षा योगींनी आपल्या पक्षातल्या लोकांची कलुषित मने स्वच्छ करावी : असदुद्दिन ओवैसी      महालक्ष्मी एक्स्प्रेस वर मध्यरात्री दरोडा, जेजुरी राजेवाडी स्टेशन येथील घटना, सिग्नल नादुरुस्त करून केली लूट      पर्यटनासाठी आलेल्या स्वित्झर्लंडच्या एका जोडप्याला उत्तर प्रदेशच्या फतेहपूर सीक्रीत एका टोळक्याने केली मारहाण      मुंबै बँकेकडून राधाकृष्ण विखे-पाटील यांना नियमबाह्य कर्ज? विखेंच्या डबघाईस आलेल्या कंपनीला 35 कोटींचं कर्ज.      मुंबई - छेडछाडीच्या भीतीने तरुणीने ट्रेनमधून उडी मारल्याचं प्रकरण, आरोपीला रेल्वे पोलिसांकडून अटक.      चंदू चव्हाण यांना तीन महिन्यांची शिक्षा, एलओसी ओलांडल्याप्रकरणी चंदू चव्हाण दोषी      अमिताभ बच्चन यांच्या अनधिकृत बांधकामास एमआरटीपीची नोटीस      गडचिरोलीतील 1036 गावांनी घेतला नक्षल गावबंदीचा ठराव
...

क्रिकेटचा देव या गोलंदाजाचा सामना करायला घाबरायचा

मुंबई, दि. १८ - एक खळबळजनक खुलासा क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकरने केला असून तो एका महान आंतरराष्ट्रीय गोलंदाचा सामना करायला खूपच भीत होता. आपण या गोलंदाजाच्या गोलंदाजीचा एवढा धसका घेतला होता की, नॉन स्ट्राइकर एंडला उभ्या असलेल्या फलंदाजाला मी म्हणायचो की, स्ट्राईक तुझ्याकडेच राहु दे, तेंडुलकरने सांगितले.

आपल्या २४ वर्षाच्या प्रदीर्घ आंतराष्ट्रीय क्रिकेट कारकिर्दीत १९९९ मध्ये ऑस्ट्रेलियामध्ये झालेली कसोटी मालिका सर्वात कठीण अशी मालिका होती असे महान फलंदाज सचिन तेंडुलकरने सांगितले. तेंडुलकरने म्हटले की, यामध्ये कोणतीही शंका नाही की, सर्वात कठीण मालिका १९९९ ची होती जेव्हा आम्ही ऑस्ट्रेलियात गेलो होतो. ऑस्ट्रेलियाचा संघ बलाढ्य होता. त्यांच्या ११ जणांच्या संघात ते खेळाडू मॅचविनर होते अन्य खेळाडूही क्षमतावान होते. हा एक संघ होता ज्याने जागतिक क्रिकेटमध्ये अनेक वर्षे आपला दबदबा कायम ठेवला होता. त्यांच्या खेळण्याची शैली खूपच आक्रामक होती. स्टीव वॉच्या नेतृत्वाखालील संघाने तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेत भारताला - असा व्हाईटवॉश दिला होता.

आतापर्यंत कधीही समोर आलेले रहस्य तेंडुलकरने खुले केले, की दक्षिण आफ्रिकेचा माजी कर्णधार हॅन्सी क्रोनिएच्या गोलंदाजी सामना करायला सचिनला आवडत नव्हते. सचिन म्हणाला की, मी १९८९ पासून खेळायला सुरूवात केली. मी तेव्हापासून कमीत-कमी २५ आंतरराष्ट्रीय दर्जाच्या गोलंदाजांचा सामना केला. परंतु ज्याच्या चेंडूंचा सामना करायला मला बिल्कूल आवडत नव्हेत तो म्हणजे हॅन्सी क्रोनिए होता. त्याच्या गोलंदाजीवर मी कोणत्या ना कोणत्या कारणाने बाद होत होतो आणि मला हे पक्के समजले होते की, त्याच्या गोलंदाजीच्या वेळी मी नॉनस्ट्रायकिंग एंडलाच उभा चांगला आहे. खेळपट्टीवर तेव्हा जो कोणी दुसरा फलंदाज असायचा त्याला मी सांगत होतो की, हॅन्सीच्या गोलंदाजीवेळी स्ट्राईक तुझ्याकडेच ठेव.

सचिन तेंडुलकरला दक्षिण आफ्रिकेचा माजी कर्णधार हॅन्सी क्रोनिएने ३२ एकदिवसीय सामन्यात केवळ तीन वेळा बाद केले होते. परंतु ११ कसोटी Posted On: 18 May 2017