ब्रेकिंग न्यूज
सावंतवाडी स्थानकाजवळ दुरांतो एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरले      इंडोनेशियात फटाक्यांच्या कारखान्याला आग, २३ ठार, ४३ जखमी      ताजमहालची सफाई करण्यापेक्षा योगींनी आपल्या पक्षातल्या लोकांची कलुषित मने स्वच्छ करावी : असदुद्दिन ओवैसी      महालक्ष्मी एक्स्प्रेस वर मध्यरात्री दरोडा, जेजुरी राजेवाडी स्टेशन येथील घटना, सिग्नल नादुरुस्त करून केली लूट      पर्यटनासाठी आलेल्या स्वित्झर्लंडच्या एका जोडप्याला उत्तर प्रदेशच्या फतेहपूर सीक्रीत एका टोळक्याने केली मारहाण      मुंबै बँकेकडून राधाकृष्ण विखे-पाटील यांना नियमबाह्य कर्ज? विखेंच्या डबघाईस आलेल्या कंपनीला 35 कोटींचं कर्ज.      मुंबई - छेडछाडीच्या भीतीने तरुणीने ट्रेनमधून उडी मारल्याचं प्रकरण, आरोपीला रेल्वे पोलिसांकडून अटक.      चंदू चव्हाण यांना तीन महिन्यांची शिक्षा, एलओसी ओलांडल्याप्रकरणी चंदू चव्हाण दोषी      अमिताभ बच्चन यांच्या अनधिकृत बांधकामास एमआरटीपीची नोटीस      गडचिरोलीतील 1036 गावांनी घेतला नक्षल गावबंदीचा ठराव
...

भारतीय फुटबॉल संघाने इटालीला हरवून घडविला अभूतपूर्व इतिहास

मुंबई, दि. २० - भारताच्या १७ वर्षांखालील फुटबॉल संघाने चार वेळेस जगज्जेत्या इटालीला पराभूत करून नवा इतिहास रचला आहे. भारत आणि इटालीच्या १७ वर्षांखालील फुटबॉल संघामध्ये हा मैत्रीपूर्ण सामना शुक्रवारी अरिझो, इटाली येथे झाला. इटालीने फिफा विश्वचषक चार वेळेस जिंकला आहे. भारतीय संघाने या संघाला हरविण्याची ही पहिलीच वेळ आहे. भारतीय संघाने इटालीच्या संघाला -० असे हरविले.

अभिजीत सरकार आणि राहुल प्रवीण यांनी भारताकडून हे गोल नोंदविले. या वर्षी १७ वर्षांखालील फुटबॉल संघांचा विश्वचषक भारतात होणार आहे. त्यासाठी सराव म्हणून भारतीय संघ युरोपच्या दौऱ्यावर आहे. त्यानिमित्त झालेल्या मैत्रीपूर्ण सामन्यात हा इतिहास रचण्यात आला.

क्रीडामंत्री विजय गोयल यांनी या ऐतिहासिक विजयाबद्दल १७ वर्षांखालील भारतीय फुटबॉल संघाचे अभिनंदन केले आहे. माजी क्रिकेटपटू वीरेंद्र सहवाग यानेही ट्वीटरवरून या खेळाडूंचे अभिनंदन केले असून हा चित्तथरारक विजय असल्याचे म्हटले आहे. तसेच, ‘इटली की तो इडली बन गईअशी खास टिप्पणीही केली आहे.