ब्रेकिंग न्यूज
उल्हासनगर : रेल्वे स्टेशनबाहेर वडापावच्या दुकान मालकाला जिवंत जाळण्याचा प्रयत्न, चंदरलाल रामरखियानी 100 % भाजले      पाकिस्तानात बेपत्ता झालेले दोन्ही मौलवी भारतात परतले      बेळगावात ड्राय डेच्या दिवशी दारु न दिल्याने पोलिसांची हॉटेल मॅनेजरला लाथा-बुक्क्यांनी मारहाण      नागपूरमध्ये राजू शेट्टी यांचे स्टेट बँक इंडियाच्या कार्यालयाबाहेर आंदोलन      पतीची हत्या करुन मृतदेह बीएमडब्ल्यू गाडीत लपवला, पत्नीविरोधात गुन्हा दाखल, पंजाबमधील घटना      उत्तरप्रदेशमध्ये बहुजन समाज पक्षाचे नेते मोहम्मद समी यांची भररस्त्यात हत्या      छत्तीसगडमधील दंतेवाडामधूल पाच नक्षलवाद्यांकडून मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा हस्तगत      महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांना फसवणारा, जनतेला गाजर दाखवणारा अर्थसंकल्पः जयंत पाटील      जळगाव : शहरापासून जवळच असलेल्या भादली गावात मध्यरात्री एका कुटुंबातील चौघांची चोरटयांनी हत्या केली.      मुंबईने गमावला मतदानाचा अधिकार, ईशान्य भारतातील राज्यांना मिळाला BCCI मध्ये मतदानाचा हक्क
...

मुंबई-पुणे सामन्यातील शेवटच्या षटकातील थरार, मुंबई विजयी

हैद्राबाद, दि. २१ - आयपीएलच्या दहाव्या मोसमाच्या अंतिम सामन्यात मुंबई इंडियन्सनं अगदी शेवटच्या क्षणी पुण्याचा विजयाचा घास हिसकावून घेतला. रायझिंग पुणे सुपरजायंट्सवर अवघ्या एका धावेने विजय मिळवत मुंबईने तिसऱ्यांदा आयपीएल विजेतेपद पटकावलंहैदराबादच्या राजीव गांधी मैदानात शेवटच्या चेंडूपर्यंत सामना रंगला होता. अवघ्या एका धावेनं विजय मिळवत मुंबईनं पुणेवर मात केली

मुंबईनं प्रथम फलंदाजी करताना पुण्यासमोर अवघ्या १३० धावांचं आव्हान ठेवलं होतं. पण पुण्याला फक्त १२८ धावांपर्यंतच मजल मारता आली. अजिंक्य रहाणे आणि कर्णधार स्मिथ यांचा अपवाद वगळता पुण्याचे इतर फलंदाज फारशी चमक दाखवू शकले नाही

हा सामना प्रचंड उत्कंटावर्धक झाला होता. अगदी शेवटच्या चेंडूपर्यंत सामना कोण जिंकणार हे समजणं कठीण होतं. शेवटच्या दोन षटकामध्ये पुण्याला जिंकण्यासाठी २३ धावांची गरज होती. कर्णधार स्मिथनं बुमराहला लाँग ऑफला षटकार ठोकून १९ व्या ओव्हरमध्ये १२ धावा केल्या. त्यामुळे शेवटच्या ओव्हरमध्ये पुण्याला विजयासाठी फक्त ११ धावांची गरज होती

कर्णधार रोहीत शर्मानं चेंडू अनुभवी मिचेल जॉन्सनकडे सोपवला. पण त्याचा पहिल्याच चेंडूवर मनोज तिवारीनं शानदार फटका मारुन चौकार लगावला. त्यामुळे पुण्याला पाच चेंडूत फक्त धावा हव्या होत्या. पण दुसऱ्याच चेंडूवर पुन्हा एक जोरदार फटका मारण्याचा नादात मनोज तिवारी बाद झाला. त्यामुळे सामन्याची पूर्ण जबाबदारी कर्णधार स्मिथवर आली. आता पुण्याला चेंडूत धावांची गरज होती

जॉन्सननं या चेंडूला थोडीशी गती दिली. स्मिथनं यावर जोरदार प्रहार केला देखील पण एक्स्ट्रा कव्हरवर उभ्या असलेल्या अंबाती रायडूनं अचूक कॅच घेतला अन् इथेच सामना फिरला. लागोपाठ दोन चेंडूवर दोन गडी बाद झाल्यानं पुण्याची अवस्था बिकट झाली. त्यामुळे आता पुण्याला चेंडूत धावा हव्या होत्या

मैदानात वॉश्गिंटन सुंदर आणि डेनियल क्रिस्टियन हे दोघेही नवखे खेळाडू होते. जॉन्सननं वॉश्गिंटन सुंदरला अप्रतिम चेंडू टाकला. पण पार्थिवकडे गेलेल्या चेंडूवर धाव घेत क्रिस्टियन स्ट्राईकवर आला. त्यामुळे आता पुण्याला चेंडूत धावा हव्या होत्या