ब्रेकिंग न्यूज
सावंतवाडी स्थानकाजवळ दुरांतो एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरले      इंडोनेशियात फटाक्यांच्या कारखान्याला आग, २३ ठार, ४३ जखमी      ताजमहालची सफाई करण्यापेक्षा योगींनी आपल्या पक्षातल्या लोकांची कलुषित मने स्वच्छ करावी : असदुद्दिन ओवैसी      महालक्ष्मी एक्स्प्रेस वर मध्यरात्री दरोडा, जेजुरी राजेवाडी स्टेशन येथील घटना, सिग्नल नादुरुस्त करून केली लूट      पर्यटनासाठी आलेल्या स्वित्झर्लंडच्या एका जोडप्याला उत्तर प्रदेशच्या फतेहपूर सीक्रीत एका टोळक्याने केली मारहाण      मुंबै बँकेकडून राधाकृष्ण विखे-पाटील यांना नियमबाह्य कर्ज? विखेंच्या डबघाईस आलेल्या कंपनीला 35 कोटींचं कर्ज.      मुंबई - छेडछाडीच्या भीतीने तरुणीने ट्रेनमधून उडी मारल्याचं प्रकरण, आरोपीला रेल्वे पोलिसांकडून अटक.      चंदू चव्हाण यांना तीन महिन्यांची शिक्षा, एलओसी ओलांडल्याप्रकरणी चंदू चव्हाण दोषी      अमिताभ बच्चन यांच्या अनधिकृत बांधकामास एमआरटीपीची नोटीस      गडचिरोलीतील 1036 गावांनी घेतला नक्षल गावबंदीचा ठराव
...

सामन्याआधीच पाकिस्तानला धक्का, फिटनेसमध्ये अकमल अपात्र

लाहोर, दि. २३ (वृत्तसंस्था) - आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीतील भारताचा पहिलाच सामना पाकिस्तानविरुद्ध जूनला होणार आहे. पण या सामन्याआधीच पाकिस्तानला एक मोठा धक्का बसला आहे. मागील काही दिवसांपासून दोन फिटनेस टेस्टमध्ये पात्र ठरल्यानं पाकिस्तानी फलंदाच उमर अकमलला माघारी बोलावण्यात आलं आहे. चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी पाकिस्तानी संघात उमर अकमलची निवड करण्यात आली होती. मात्र, फिटनेस टेस्ट पास होऊ शकल्यानं पीसीबीनं अकमलला इंग्लंडहून परत बोलवण्याचा निर्णय घेतला आहे.

उमर अकमलच्या जागी उमर अमीन किंवा हारिस सोहेल यांना संधी मिळण्याची शक्यता आहे. याबाबत सध्या निवड समितीत चर्चा सुरु आहे. क्रिकइन्फोनं पीसीबीचे अध्यक्ष शहरयार खान यांच्या हवाल्यानं असं म्हटलं आहे की, ‘तो (उमर अकमल) चॅम्पियन्स ट्रॉफीआधी इंग्लंडमध्ये सुरु असलेल्या ट्रेंनिग कॅम्पमधील दोन फिटनेस टेस्टमध्ये अपात्र ठरला आहे. त्यामुळे अनफिट खेळाडूंना खेळवू नये असा आमचा नियम आहे. त्यामुळेच आम्ही त्याला मायदेशी बोलवण्याचा निर्णय घेतला आहे. आम्ही त्याच्या जागी दुसरा खेळाडू पाठवू. आमच्याकडे २५ मेपर्यंत वेळ आहे. त्यामुळे नेमकं कोणाला पाठवायचं यासाठी आमच्याकडे थोडा वेळ आहे.

मागील महिन्यात वेस्टइंडिज दौऱ्यासाठी उमर अकमलची निवड करण्यात आली नव्हती. पण चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी त्यानं संघात पुनरागमन केलं होतं. पण आता पुन्हा एकदा त्याला संघाबाहेर राहावं लागणार आहे.