ब्रेकिंग न्यूज
सावंतवाडी स्थानकाजवळ दुरांतो एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरले      इंडोनेशियात फटाक्यांच्या कारखान्याला आग, २३ ठार, ४३ जखमी      ताजमहालची सफाई करण्यापेक्षा योगींनी आपल्या पक्षातल्या लोकांची कलुषित मने स्वच्छ करावी : असदुद्दिन ओवैसी      महालक्ष्मी एक्स्प्रेस वर मध्यरात्री दरोडा, जेजुरी राजेवाडी स्टेशन येथील घटना, सिग्नल नादुरुस्त करून केली लूट      पर्यटनासाठी आलेल्या स्वित्झर्लंडच्या एका जोडप्याला उत्तर प्रदेशच्या फतेहपूर सीक्रीत एका टोळक्याने केली मारहाण      मुंबै बँकेकडून राधाकृष्ण विखे-पाटील यांना नियमबाह्य कर्ज? विखेंच्या डबघाईस आलेल्या कंपनीला 35 कोटींचं कर्ज.      मुंबई - छेडछाडीच्या भीतीने तरुणीने ट्रेनमधून उडी मारल्याचं प्रकरण, आरोपीला रेल्वे पोलिसांकडून अटक.      चंदू चव्हाण यांना तीन महिन्यांची शिक्षा, एलओसी ओलांडल्याप्रकरणी चंदू चव्हाण दोषी      अमिताभ बच्चन यांच्या अनधिकृत बांधकामास एमआरटीपीची नोटीस      गडचिरोलीतील 1036 गावांनी घेतला नक्षल गावबंदीचा ठराव
...

रवि शास्त्रीबाबत कपिल देव यांचा खळबळजनक खुलासा

नवी दिल्ली, दि. २४ (वृत्तसंस्था) - टीम इंडियाचा माजी कर्णधार आणि ऑलराऊंडर कपिल देव यांनी आपला सहखेळाडू रवि शास्त्रीबद्दल खळबळजनक खुलासा केला आहे. क्रिकेटवर ‘नंबर्स डू लाय’ नावाचे एक पुस्तक आकाश चोपडाने लिहिले आहे. या पुस्तकाच्या प्रकाशन करताना एक प्रेस कॉन्फरन्स बोलावण्यात आली होती. यावेळी कपिल देव बोलत होते. रवि शास्त्रीसारखा खेळाडू ज्यामध्ये कोणतेही टॅलेंट नाही आणि तो एवढ्या प्रदीर्घ काळ क्रिकेट खेळू शकतो, मी समजतो की ही त्याची सफलता आहे. 

क्रिकेटची कोणतीही प्रतिभा रवि शास्त्रीमध्ये नव्हती, पण तो जिंकण्याच्या तीव्र इच्छेखातर दीर्घकाळ भारतीय टीममध्ये स्थान मिळवण्यात यशस्वी ठरला, असे कपिल देव यांनी म्हटले आहे. रवि शास्त्रीची इच्छाशक्ती कमालीची होती. टीममध्ये आम्ही या गोष्टीचे कौतुक करतो. आम्ही म्हणायचो, रवि ३० ओव्हरपर्यंत खेळ, भले १० रन्स का बनवेना, तुझे ३० ओव्हर खेळणे चांगले ठरेल कारण त्यानंतर बॉलिंग थोडी थंड पडते. मग आम्ही बॉलर्सला ठोकून काढू शकतो, अशी आठवणही त्यांनी यावेळी सांगितली.