ब्रेकिंग न्यूज
सावंतवाडी स्थानकाजवळ दुरांतो एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरले      इंडोनेशियात फटाक्यांच्या कारखान्याला आग, २३ ठार, ४३ जखमी      ताजमहालची सफाई करण्यापेक्षा योगींनी आपल्या पक्षातल्या लोकांची कलुषित मने स्वच्छ करावी : असदुद्दिन ओवैसी      महालक्ष्मी एक्स्प्रेस वर मध्यरात्री दरोडा, जेजुरी राजेवाडी स्टेशन येथील घटना, सिग्नल नादुरुस्त करून केली लूट      पर्यटनासाठी आलेल्या स्वित्झर्लंडच्या एका जोडप्याला उत्तर प्रदेशच्या फतेहपूर सीक्रीत एका टोळक्याने केली मारहाण      मुंबै बँकेकडून राधाकृष्ण विखे-पाटील यांना नियमबाह्य कर्ज? विखेंच्या डबघाईस आलेल्या कंपनीला 35 कोटींचं कर्ज.      मुंबई - छेडछाडीच्या भीतीने तरुणीने ट्रेनमधून उडी मारल्याचं प्रकरण, आरोपीला रेल्वे पोलिसांकडून अटक.      चंदू चव्हाण यांना तीन महिन्यांची शिक्षा, एलओसी ओलांडल्याप्रकरणी चंदू चव्हाण दोषी      अमिताभ बच्चन यांच्या अनधिकृत बांधकामास एमआरटीपीची नोटीस      गडचिरोलीतील 1036 गावांनी घेतला नक्षल गावबंदीचा ठराव
...

नव्या लूकसह लंडनमध्ये दाखल झाला विराट

लंडन, दि. २६ - नव्या लूकसह चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी इंग्लंडमध्ये टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली दाखल झाला असून जून रोजी डिफेंडिंग चॅम्पियन भारताचा पहिला सामना पाकिस्तानसोबत होणार आहे.

लंडनमध्ये दाखल होताच विराटने इन्स्टाग्राम अकाऊंटवर आपला फोटो शेअर केला. ज्याने विराटचा लूक बदलला, तो हेअरड्रेसर या फोटोमध्ये दिसत आहे. फोटो शेअर करताना विराटने हेअरस्टायलिस्टचे आभारही मानले आहेत. हा हेअरस्टायलिस्ट म्हणजे आलिम हाकिम, ज्याने काही दिवसांपूर्वी गायक सोनू निगमचे मुंडन केले होते.

बॉलिवूडचा सेलिब्रिटी हेअरस्टायलिस्ट म्हणून आलिम हाकिम ओळखला जातो. त्याच्या क्लायंट लिस्टमध्ये हृतिक रोशन, रणबीर कपूर आणि वरुण धवन यांचा समावेश आहे. आलिमनेही आपल्या इन्स्टाग्रामवर विराट कोहलीच्या हेअरस्टाईलचा फोटो शेअर केला आहे. आलिमने भारताचा अभिमान या शब्दात विराटवर स्तुतीसुमने उधळली आहेत. शिवाय त्याच्या फॅशन आणि स्टाईलचेही कौतुक केले आहे.