ब्रेकिंग न्यूज
सावंतवाडी स्थानकाजवळ दुरांतो एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरले      इंडोनेशियात फटाक्यांच्या कारखान्याला आग, २३ ठार, ४३ जखमी      ताजमहालची सफाई करण्यापेक्षा योगींनी आपल्या पक्षातल्या लोकांची कलुषित मने स्वच्छ करावी : असदुद्दिन ओवैसी      महालक्ष्मी एक्स्प्रेस वर मध्यरात्री दरोडा, जेजुरी राजेवाडी स्टेशन येथील घटना, सिग्नल नादुरुस्त करून केली लूट      पर्यटनासाठी आलेल्या स्वित्झर्लंडच्या एका जोडप्याला उत्तर प्रदेशच्या फतेहपूर सीक्रीत एका टोळक्याने केली मारहाण      मुंबै बँकेकडून राधाकृष्ण विखे-पाटील यांना नियमबाह्य कर्ज? विखेंच्या डबघाईस आलेल्या कंपनीला 35 कोटींचं कर्ज.      मुंबई - छेडछाडीच्या भीतीने तरुणीने ट्रेनमधून उडी मारल्याचं प्रकरण, आरोपीला रेल्वे पोलिसांकडून अटक.      चंदू चव्हाण यांना तीन महिन्यांची शिक्षा, एलओसी ओलांडल्याप्रकरणी चंदू चव्हाण दोषी      अमिताभ बच्चन यांच्या अनधिकृत बांधकामास एमआरटीपीची नोटीस      गडचिरोलीतील 1036 गावांनी घेतला नक्षल गावबंदीचा ठराव
...

आता टी-२०मध्ये देखील डीआरएस

लंडन, दि. २६ (वृत्तसंस्था) - या पुढे डीआरएस पद्धतीचा अवलंब टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यात केला जावा, अशी शिफारस भारताचे प्रमुख प्रशिक्षक अनिल कुंबळेच्या नेतृत्वाखाली झालेल्या आयसीसीच्या क्रिकेट समितीने केली आहे. तसेच मैदानावर बेशिस्त वर्तन करणा-या क्रिकेटपटूंना मैदानाबाहेर काढण्याचा अधिकार द्यावा, असे या समितीच्या बैठकीमध्ये सुचित करण्यात आले आहे.

सामन्यामध्ये पंचांनी फलंदाजाला पायचीत बाद झाल्याचा निर्णय घेतल्यानंतर कोणताही संघ पंचाच्या या निर्णयाविरूद्ध डीआरएस पद्धतीची मागणी करतो. या पद्धतीचा अवलंब कसोटी क्रिकेटमध्ये करण्यासाठी विविध देशांकडून सहकार्य अपेक्षित आहे. डीआरएस पद्धतीचा अवलंब आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या भविष्यकाळात महत्त्वाचा ठरेल, असेही या बैठकीमध्ये सांगण्यात आले. २०१७च्या क्रिकेट नियमावलीमध्ये काही नवे बदल या समितीतर्फे सुचविण्यात आले आहेत.

या समितीने मैदानावर बेशिस्त वर्तन करणा-या क्रिकेटपटूला मैदानाबाहेर काढण्याचा अधिकार मैदानावरील पंचांना दिले जावे, अशी शिफारस केली आहे. दोन दिवस चाललेल्या या समितीच्या बैठकीमध्ये विविध सूचना करण्यात आल्या. या बैठकीला या समितीचे सदस्य क्लेरी कॉनर, राहुल द्रविड, ग्रिफीथ, महेला जयवर्धने, डेव्हिड केंड्रीक्स, किटलबॉरो, डरेन लिमन, रंजन मदुगुले, टीम मे, केव्हीन ओब्रायन, शॉन पोलॉक, जॉन स्टिफनसन, स्ट्रॉस, डेव्हिड व्हाईट उपस्थित होते.