ब्रेकिंग न्यूज
सावंतवाडी स्थानकाजवळ दुरांतो एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरले      इंडोनेशियात फटाक्यांच्या कारखान्याला आग, २३ ठार, ४३ जखमी      ताजमहालची सफाई करण्यापेक्षा योगींनी आपल्या पक्षातल्या लोकांची कलुषित मने स्वच्छ करावी : असदुद्दिन ओवैसी      महालक्ष्मी एक्स्प्रेस वर मध्यरात्री दरोडा, जेजुरी राजेवाडी स्टेशन येथील घटना, सिग्नल नादुरुस्त करून केली लूट      पर्यटनासाठी आलेल्या स्वित्झर्लंडच्या एका जोडप्याला उत्तर प्रदेशच्या फतेहपूर सीक्रीत एका टोळक्याने केली मारहाण      मुंबै बँकेकडून राधाकृष्ण विखे-पाटील यांना नियमबाह्य कर्ज? विखेंच्या डबघाईस आलेल्या कंपनीला 35 कोटींचं कर्ज.      मुंबई - छेडछाडीच्या भीतीने तरुणीने ट्रेनमधून उडी मारल्याचं प्रकरण, आरोपीला रेल्वे पोलिसांकडून अटक.      चंदू चव्हाण यांना तीन महिन्यांची शिक्षा, एलओसी ओलांडल्याप्रकरणी चंदू चव्हाण दोषी      अमिताभ बच्चन यांच्या अनधिकृत बांधकामास एमआरटीपीची नोटीस      गडचिरोलीतील 1036 गावांनी घेतला नक्षल गावबंदीचा ठराव
...

धोनीला मिळणाऱ्या विशेष वागणूकीवर भज्जी नाराज

मुंबई, दि. २६ - भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीला संघ निवडीच्या वेळी विशेषाधिकार दिले जातात असे हरभजन सिंग म्हणाला आहे. महेंद्रसिंग धोनीची निवड आयसीसी चॅम्पिअन्स ट्रॉफीसाठी झाल्याच्या पार्श्वभुमीवर बोलताना हरभजन सिंगने हे वक्तव्य केले आहे. धोनी फॉर्ममध्ये नसला तरी त्याच्याकडे रणनीती आखण्याची योग्य क्षमता असल्यामुळे त्याने अनेकदा सामना आपल्याबाजूने झुकवला असल्याचे बीसीसीआय निवड समितीचे अध्यक्ष एम. एस. के. प्रसाद बोलले होते. हरभजनने यावर प्रतिक्रिया देताना आपणदेखील सीनिअर खेळाडू असून फक्त बॉलिंग नाही तर धोनीप्रमाणे सामना आपल्या बाजूने झुकवण्याची क्षमता असतानाही आपला विचार केला गेला नाही अशी टीका केली आहे.

फॉर्ममध्ये असो किंवा नसो पण धोनी आपल्या बँटिंगच्या जोरावर नाही, तर इतर गोष्टींमुळे संघाला पुढे घेऊन जातो यात दुमत नाही. पण तो अगोदर ज्याप्रमाणे खेळायचा तसा तो आता खेळत नाही हेदेखील तेवढेच खरे असल्याचे हरभजन बोलला आहे. तो कर्णधार राहिला असल्याने त्याला खेळ कळतो आणि ही त्याची जमेची बाजू असल्याचे हरभजनने सांगितले आहे. पण जेव्हा माझी वेळ येते, तेव्हा मला अशी विशेष वागणूक दिली जात नाही, अशी खंत हरभजनने व्यक्त केली आहे.