ब्रेकिंग न्यूज
सावंतवाडी स्थानकाजवळ दुरांतो एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरले      इंडोनेशियात फटाक्यांच्या कारखान्याला आग, २३ ठार, ४३ जखमी      ताजमहालची सफाई करण्यापेक्षा योगींनी आपल्या पक्षातल्या लोकांची कलुषित मने स्वच्छ करावी : असदुद्दिन ओवैसी      महालक्ष्मी एक्स्प्रेस वर मध्यरात्री दरोडा, जेजुरी राजेवाडी स्टेशन येथील घटना, सिग्नल नादुरुस्त करून केली लूट      पर्यटनासाठी आलेल्या स्वित्झर्लंडच्या एका जोडप्याला उत्तर प्रदेशच्या फतेहपूर सीक्रीत एका टोळक्याने केली मारहाण      मुंबै बँकेकडून राधाकृष्ण विखे-पाटील यांना नियमबाह्य कर्ज? विखेंच्या डबघाईस आलेल्या कंपनीला 35 कोटींचं कर्ज.      मुंबई - छेडछाडीच्या भीतीने तरुणीने ट्रेनमधून उडी मारल्याचं प्रकरण, आरोपीला रेल्वे पोलिसांकडून अटक.      चंदू चव्हाण यांना तीन महिन्यांची शिक्षा, एलओसी ओलांडल्याप्रकरणी चंदू चव्हाण दोषी      अमिताभ बच्चन यांच्या अनधिकृत बांधकामास एमआरटीपीची नोटीस      गडचिरोलीतील 1036 गावांनी घेतला नक्षल गावबंदीचा ठराव
...

विराट कोहली म्हणजे माझ्या डाव्या हातचा मळ – जुनेद खान

मुंबई, दि. २९ - जुन महिन्यापासून चॅम्पियन्स ट्रॉफीचा थरार पहायला मिळणार असून जून रोजी चॅम्पियन्स ट्रॉफीचा महामुकाबला रंगणार आहे. या तारखेला भारत आणि पाकिस्तान हे दोन्ही संघ एकमेकांना भिडणार आहेत. केवळ भारत-पाकिस्तानच नाही तर जगभरातील क्रिकेटप्रेमी या सामन्याची आतूरतेने वाट पाहत आहेत. पण या सामन्यापूर्वी पाकिस्तानच्या गोलंदाजाने टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीवर निशाणा साधला आहे.

पाकिस्तानचा जलदगती गोलंदाज जुनेद खान याने विराट कोहलीला डिवचले आहे. पाकिस्तानी मीडियाला दिलेल्या मुलाखतीत तो म्हणाला, भारताचा कॅप्टन विराट कोहली तल्लख फलंदाज आहे; पण माझ्यापुढे त्याची डाळ शिजत नाही. अर्थात याला कारण म्हणजे डावखु-या जुनेदने चारपैकी तीनवेळा विराट कोहलीची विकेट काढली आहे. इंग्लंडमध्येही मला विराट कोहलीची विकेट अगदी सहज मिळेल, असेही जुनेद म्हणाला. कोहली आणि जुनेद आता वर्षानंतर एकमेकांसमोर येणार आहेत.

अनेक क्रिकेटर्स नेहमीच मीडियासमोर प्रतिस्पर्धी टीमच्या प्लेयर्सला कमी लेखणे आणि त्याचे खच्चीकरण करणे असे प्रकार करत असतात. त्याचप्रमाणे पाकिस्तानच्या जुनेद खान यानेही चॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वी विराट कोहलीला डिवचले आहे. विराट कोहली आणि त्याच्या सहका-यांनी जगभरातील ग्राऊंड्सवर जोरदार फटकेबाजी केली आहे. मात्र, माझ्याविरुद्ध त्यांना फोरही मारता आलेला नाही. मी कोहलीला अनेकदा आऊट केले असल्यामुळे तो माझ्यापासून सावध राहील आणि सहज आऊट होईल असेही जुनेद खान याने म्हटले आहे.