ब्रेकिंग न्यूज
सावंतवाडी स्थानकाजवळ दुरांतो एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरले      इंडोनेशियात फटाक्यांच्या कारखान्याला आग, २३ ठार, ४३ जखमी      ताजमहालची सफाई करण्यापेक्षा योगींनी आपल्या पक्षातल्या लोकांची कलुषित मने स्वच्छ करावी : असदुद्दिन ओवैसी      महालक्ष्मी एक्स्प्रेस वर मध्यरात्री दरोडा, जेजुरी राजेवाडी स्टेशन येथील घटना, सिग्नल नादुरुस्त करून केली लूट      पर्यटनासाठी आलेल्या स्वित्झर्लंडच्या एका जोडप्याला उत्तर प्रदेशच्या फतेहपूर सीक्रीत एका टोळक्याने केली मारहाण      मुंबै बँकेकडून राधाकृष्ण विखे-पाटील यांना नियमबाह्य कर्ज? विखेंच्या डबघाईस आलेल्या कंपनीला 35 कोटींचं कर्ज.      मुंबई - छेडछाडीच्या भीतीने तरुणीने ट्रेनमधून उडी मारल्याचं प्रकरण, आरोपीला रेल्वे पोलिसांकडून अटक.      चंदू चव्हाण यांना तीन महिन्यांची शिक्षा, एलओसी ओलांडल्याप्रकरणी चंदू चव्हाण दोषी      अमिताभ बच्चन यांच्या अनधिकृत बांधकामास एमआरटीपीची नोटीस      गडचिरोलीतील 1036 गावांनी घेतला नक्षल गावबंदीचा ठराव
...

कुंबळेच्या वागणुकीवर कोहलीसह सीनियर खेळाडूही नाराज

मुंबई, दि. ३० - चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी इंग्लंडला पोहोचलेल्या टीम इंडियामध्ये फूट पडल्याचं दिसत आहे. कर्णधार विराट कोहली आणि भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक अनिल कुंबळे यांच्यात सारंकाही आलबेल नसल्याचं कळतं. विराट कोहलीसह टीम इंडियाचे अनेक सीनियर खेळाडू प्रशिक्षक अनिल कुंबळे यांच्यावर नाराज आहेत. अनिल कुंबळे ज्यापद्धतीने संघाला मार्गदर्शन करतो, त्यावर खेळाडू नाखुश आहेत. कुंबळे संघात वट निर्माण करत आहे. ह्या वागणुकीमुळेच खेळाडूंनी बीसीसीआयच्या अधिकाऱ्यांना कुंबळेची तक्रार केली आहे. टीम इंडियाचे सीनियर खेळाडू ड्रेसिंग रुममध्ये कुंबळेच्या अॅटिट्यूडला कंटाळले आहेत. खेळाडूंच्या मते, कुंबळे ड्रेसिंग रुममधील त्यांच्या स्वातंत्र्यावर गदा आणत आहे.

विराट कोहली आणि अनिल कुंबळे यांच्यातील धुसफूस मार्च महिन्यात धर्मशालामध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या चौथ्या आणि अखेरच्या कसोटी सामन्यादरम्यान सुरु झाली. चायनामन गोलंदाज कुलदीप यादवच्या संघातील समावेशाबद्दल विराट कोहलीला अगदी शेवटच्या क्षणी सांगण्यात आलं होतं, असं काही वृत्तात म्हटलं आहे.

चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये भारतीय संघाचा पहिला सामना पाकिस्तानविरुद्ध जून रोजी खेळवण्यात येणार आहे. पण त्याआधी कुंबळे आणि कोहलीमध्ये समेट घडवून आणण्याचा प्रयत्न सुरु आहे. सल्लागार समितीचे सदस्य आणि माजी क्रिकेटर सचिन तेंडुलकर, सौरभ गांगुली आणि व्हीव्हीएस लक्ष्मण या दोघांमध्ये समेट घडवून आणू शकतात. मात्र टीम इंडियाचा नवा प्रशक्षिक निवडण्याची जबाबदारीही याच तीन दिग्गजांवर सोपवण्यात आली आहे.

बीसीसीआयचे अधिकारी कुंबळेवर नाराज
बीसीसीआयचं विद्यमान अधिकाऱ्यांना अनिल कुंबळे पसंत नाही. बीसीसीआयचे हे अधिकारी चॅपियन्स ट्रॉफी खेळण्याची धमकी देत होते, तेव्हा कुंबळेनेच सुप्रीम कोर्टाने नेमलेल्या प्रशासकांच्या समितीला संदेश पाठवून, खेळाडूंना या स्पर्धेत खेळण्याची इच्छा असल्याचं सांगितलं. ही बाब बीसीसीआयच्या अधिकाऱ्यांना आवडली नाही
.