ब्रेकिंग न्यूज
सावंतवाडी स्थानकाजवळ दुरांतो एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरले      इंडोनेशियात फटाक्यांच्या कारखान्याला आग, २३ ठार, ४३ जखमी      ताजमहालची सफाई करण्यापेक्षा योगींनी आपल्या पक्षातल्या लोकांची कलुषित मने स्वच्छ करावी : असदुद्दिन ओवैसी      महालक्ष्मी एक्स्प्रेस वर मध्यरात्री दरोडा, जेजुरी राजेवाडी स्टेशन येथील घटना, सिग्नल नादुरुस्त करून केली लूट      पर्यटनासाठी आलेल्या स्वित्झर्लंडच्या एका जोडप्याला उत्तर प्रदेशच्या फतेहपूर सीक्रीत एका टोळक्याने केली मारहाण      मुंबै बँकेकडून राधाकृष्ण विखे-पाटील यांना नियमबाह्य कर्ज? विखेंच्या डबघाईस आलेल्या कंपनीला 35 कोटींचं कर्ज.      मुंबई - छेडछाडीच्या भीतीने तरुणीने ट्रेनमधून उडी मारल्याचं प्रकरण, आरोपीला रेल्वे पोलिसांकडून अटक.      चंदू चव्हाण यांना तीन महिन्यांची शिक्षा, एलओसी ओलांडल्याप्रकरणी चंदू चव्हाण दोषी      अमिताभ बच्चन यांच्या अनधिकृत बांधकामास एमआरटीपीची नोटीस      गडचिरोलीतील 1036 गावांनी घेतला नक्षल गावबंदीचा ठराव
...

बांगलादेशचा केवळ ८४ धावात खुर्दा, भारताचा २४० धावांनी विजय

लंडन, दि. ३१ (वृत्तसंस्था) - कर्णधार विराट कोहलीच्या टीम इंडियाने लागोपाठ दुसऱ्या सराव सामन्यात शानदार विजय मिळवून आपण आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी राखण्यासाठी सज्ज असल्याचं दाखवून दिलं आहे. लंडनमधल्या केनिंग्टन ओव्हलवरच्या सामन्यात भारताने बांगलादेशचा २४० धावांनी धुव्वा उडवला. भारतीय फलंदाज आणि गोलंदाजांनी या सामन्यावर निर्विवाद वर्चस्व गाजवलं.

या सामन्यात टीम इंडियाने बांगलादेशला विजयासाठी ३२५ धावांचं डोंगराएवढं आव्हान दिलं होतं. पण भारताच्या प्रभावी आक्रमणासमोर बांगलादेशचा अवघ्या ८४ धावांत खुर्दा उडाला. भारताच्या भुवनेश्वर कुमार आणि उमेश यादवने प्रत्येकी तीन फलंदाजांना माघारी धाडून बांगलादेशला गुंडाळण्यात मोलाची भूमिका बजावली.

त्याआधी भारतीय फलंदाजांनी धावांच्या वाहत्या गंगेत हात धुवून घेतले. दिनेश कार्तिकने ७७ चेंडूंत ९४ धावांची, शिखर धवनने ६७ चेंडूंत ६० धावांची आणि हार्दिक पंड्याने ५४ चेंडूंत नाबाद ८० धावांची खेळी करुन भारताच्या डावाच्या उभारणीत प्रमुख योगदान दिलं. केदार जाधवने ३१ आणि रवींद्र जाडेजाने ३२ धावांची खेळी केली.