ब्रेकिंग न्यूज
उल्हासनगर : रेल्वे स्टेशनबाहेर वडापावच्या दुकान मालकाला जिवंत जाळण्याचा प्रयत्न, चंदरलाल रामरखियानी 100 % भाजले      पाकिस्तानात बेपत्ता झालेले दोन्ही मौलवी भारतात परतले      बेळगावात ड्राय डेच्या दिवशी दारु न दिल्याने पोलिसांची हॉटेल मॅनेजरला लाथा-बुक्क्यांनी मारहाण      नागपूरमध्ये राजू शेट्टी यांचे स्टेट बँक इंडियाच्या कार्यालयाबाहेर आंदोलन      पतीची हत्या करुन मृतदेह बीएमडब्ल्यू गाडीत लपवला, पत्नीविरोधात गुन्हा दाखल, पंजाबमधील घटना      उत्तरप्रदेशमध्ये बहुजन समाज पक्षाचे नेते मोहम्मद समी यांची भररस्त्यात हत्या      छत्तीसगडमधील दंतेवाडामधूल पाच नक्षलवाद्यांकडून मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा हस्तगत      महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांना फसवणारा, जनतेला गाजर दाखवणारा अर्थसंकल्पः जयंत पाटील      जळगाव : शहरापासून जवळच असलेल्या भादली गावात मध्यरात्री एका कुटुंबातील चौघांची चोरटयांनी हत्या केली.      मुंबईने गमावला मतदानाचा अधिकार, ईशान्य भारतातील राज्यांना मिळाला BCCI मध्ये मतदानाचा हक्क
...

रवी शास्त्रीला प्रशिक्षक बनवण्यासाठी कोहलीची लॉबिंग

नवी दिल्ली, दि. ८ (वृत्तसंस्था) - सध्या दररोज टीम इंडियाच्या प्रशिक्षक पदाच्या निवडीबाबत नव्या चर्चा आणि वावड्या उठत असून यामध्ये आता आणखी एका बातमीची भर पडली असून यापूर्वी सध्या प्रशिक्षक असणाऱ्या अनिल कुंबळे यांना मुदतवाढ देण्यास भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीने विरोध केला होता. पण त्याच कोहलीने चॅम्पियन्स करंडक स्पर्धेसाठी इंग्लंडला रवाना होण्यापूर्वी रवी शास्त्री यांना प्रशिक्षक करण्यासाठी लॉबिंग केल्याची माहिती पुढे आली आहे. याबाबतचे वृत्तटाईम्स ऑफ इंडियाने दिले असून त्यांनी दिलेल्या वृत्तामुळे रवी शास्त्री यांचे नाव आता पुन्हा एकदा चर्चेत आले आहे.

टीम इंडियाच्या प्रशिक्षकपदासाठी काही दिवसांपूर्वीच इच्छूक उमेदवारांकडून अर्ज दाखल करण्यात आल्यानंतर भारताचा माजी फलंदाज वीरेंद्र सेहवाग आणि अनेक परदेशी संघांच्या प्रशिक्षक पदाचा दीर्घ अनुभव असलेले टॉम मुडी ही दोन मुख्य नावे चर्चेत होती. तसेच गेल्या एका वर्षातील अनिल कुंबळेची प्रशिक्षक म्हणून यशस्वी कामगिरी पाहता तोदेखील या स्पर्धेतील मुख्य दावेदार मानला जात आहे.

प्रशिक्षकाची निवड सचिन तेंडुलकर, सौरव गांगुली आणि व्हीव्हीएस लक्ष्मण ही त्रिसदस्यीय समिती करणार आहे. त्यासाठी निवड समितीकडून गुरूवार किंवा शुक्रवारपासून अर्ज दाखल केलेल्या उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या जाणार आहेत. पण विराट कोहलीने टीम इंडियाचे माजी व्यवस्थापक रवी शास्त्री अर्ज दाखल करूनही त्यांच्यासाठी केलेल्या लॉबिंगमुळे चर्चेत आहेत.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, कोहली चॅम्पियन्स करंडक स्पर्धेसाठी इंग्लंडला रवाना होण्यापूर्वी २३ मे रोजी सचिन तेंडुलकर आणि व्हीव्हीएस लक्ष्मण यांना भेटला होता. विराटने त्यावेळी शास्त्री यांना मुलाखतीसाठी बोलवावे, असा प्रस्ताव त्यांच्यासमोर ठेवला होता. पण शास्त्री यांनी अर्जच दाखल केल्याने आता त्यांना मुलाखतीसाठी बोलवण्यात येणार नाही. आजच्या भारत-श्रीलंका सामन्यानंतर मुलाखत प्रक्रियेला सुरूवात होईल.