ब्रेकिंग न्यूज
सावंतवाडी स्थानकाजवळ दुरांतो एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरले      इंडोनेशियात फटाक्यांच्या कारखान्याला आग, २३ ठार, ४३ जखमी      ताजमहालची सफाई करण्यापेक्षा योगींनी आपल्या पक्षातल्या लोकांची कलुषित मने स्वच्छ करावी : असदुद्दिन ओवैसी      महालक्ष्मी एक्स्प्रेस वर मध्यरात्री दरोडा, जेजुरी राजेवाडी स्टेशन येथील घटना, सिग्नल नादुरुस्त करून केली लूट      पर्यटनासाठी आलेल्या स्वित्झर्लंडच्या एका जोडप्याला उत्तर प्रदेशच्या फतेहपूर सीक्रीत एका टोळक्याने केली मारहाण      मुंबै बँकेकडून राधाकृष्ण विखे-पाटील यांना नियमबाह्य कर्ज? विखेंच्या डबघाईस आलेल्या कंपनीला 35 कोटींचं कर्ज.      मुंबई - छेडछाडीच्या भीतीने तरुणीने ट्रेनमधून उडी मारल्याचं प्रकरण, आरोपीला रेल्वे पोलिसांकडून अटक.      चंदू चव्हाण यांना तीन महिन्यांची शिक्षा, एलओसी ओलांडल्याप्रकरणी चंदू चव्हाण दोषी      अमिताभ बच्चन यांच्या अनधिकृत बांधकामास एमआरटीपीची नोटीस      गडचिरोलीतील 1036 गावांनी घेतला नक्षल गावबंदीचा ठराव
...

पीवायसी रिबाऊंड स्पोर्टस् ३०९ रॅकेट लीग स्पर्धा १० जूनपासून

पुणे, दि. ९ - पीवायसी हिंदू जिमखाना यांच्या तर्फे अनोख्या नावीन्यपूर्ण अशा पीवायसी रिबाऊंड स्पोर्टस् ३०९ रॅकेट लीग स्पर्धेत संघात २११ हून अधिक खेळाडू सहभागी झाले आहेत. ही स्पर्धा पीवायसी हिंदू जिमखानाच्या टेबल टेनिस, टेनिस बॅडमिंटन कोर्टवर दि.१० जूनपासून सुरू होणार आहे.

पत्रकार परिषदेत अधिक माहिती देताना पीवायसी हिंदू जिमखानाचे मानद सचिव विजय कुमार ताम्हाणे यांनी सांगितले की, पीवायसी रिबाऊंड स्पोर्टस् ३०९ रॅकेट लीग ही अनोखी नावीन्यपूर्ण अशी लीग स्पर्धा मिश्र गटांत होणार असून यामध्ये प्रौढ, पुरूष, महिला आणि कुमार यांचा संघात समावेश असणार आहे. तसेच,या सर्व प्रकारांचे मिळून ३०९ गुण होतील. स्पर्धेचे हे सलग दुसरे वर्ष आहे.

तसेच, या लीगची संकल्पना गिरीश करंबळेकर, शशांक हळबे, हिमांशु गोसावी, हेमंत बेंद्रे, सुंदर अय्यर, अभिषेक ताम्हाणे, रणजीत पांडे, आलोक तेलंग आणि सारंग लागू यांनी अस्तित्वात आणली आहे. क्लबच्या सभासदांसाठी क्रिकेट, बॅडमिंटन, फिटनेस आणि रॅकेट क्रीडा प्रकारात अशी अनोखी स्पर्धा या विविध क्रीडामध्ये लीग स्पर्धा आयोजित करणारा पीवायसी हिंदू जिमखाना हा शहरांतील एकमेव क्लब आहे. या स्पर्धांच्या माध्यमातून क्लबच्या सदस्यांचे आरोग्यनिरोगी ठेवण्यास मदत होत असल्याचे ताम्हाणे यांनी सांगितले.

ताम्हाणे पुढे म्हणाले की, क्लबच्या सभासदांकरिता क्रिकेट, बॅडमिंटन, फिटनेस आणि इतर सर्व रॅकेट क्रीडा प्रकारांमध्ये अशा चार वेगवेगळ्या क्रीडा प्रकारात लीग स्पर्धा आयोजित करणारा पीवायसी हिंदू जिमखाना हा शहरांतील एकमेव क्लब आहे. तसेच या क्रीडा प्रकारांच्या माध्यमातून सदस्यांना मनोरंजनबरोबरच आपले आरोग्य उत्तम ठेवण्यास महत्वपूर्ण ठरेल. या लीगमुळे सदस्यांना सर्वसाधारण व्यासपीठ उपलब्ध होणार आहे. दोन संघांमध्ये बरोबरी झाल्यास प्रत्येक खेळाचे सामने खेळविण्यात येणार असून असे एकूण १५ सामने खेळविण्यात येणार आहे आणि या सर्वांचे मिळून ३०९ गुण होणार आहेत. प्रत्येक क्रीडा प्रकारात खेळाडूला त्याच्या खेळातील क्षमतेनुसार स्टार देण्यात येणार आहे. तसेच,