ब्रेकिंग न्यूज
सावंतवाडी स्थानकाजवळ दुरांतो एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरले      इंडोनेशियात फटाक्यांच्या कारखान्याला आग, २३ ठार, ४३ जखमी      ताजमहालची सफाई करण्यापेक्षा योगींनी आपल्या पक्षातल्या लोकांची कलुषित मने स्वच्छ करावी : असदुद्दिन ओवैसी      महालक्ष्मी एक्स्प्रेस वर मध्यरात्री दरोडा, जेजुरी राजेवाडी स्टेशन येथील घटना, सिग्नल नादुरुस्त करून केली लूट      पर्यटनासाठी आलेल्या स्वित्झर्लंडच्या एका जोडप्याला उत्तर प्रदेशच्या फतेहपूर सीक्रीत एका टोळक्याने केली मारहाण      मुंबै बँकेकडून राधाकृष्ण विखे-पाटील यांना नियमबाह्य कर्ज? विखेंच्या डबघाईस आलेल्या कंपनीला 35 कोटींचं कर्ज.      मुंबई - छेडछाडीच्या भीतीने तरुणीने ट्रेनमधून उडी मारल्याचं प्रकरण, आरोपीला रेल्वे पोलिसांकडून अटक.      चंदू चव्हाण यांना तीन महिन्यांची शिक्षा, एलओसी ओलांडल्याप्रकरणी चंदू चव्हाण दोषी      अमिताभ बच्चन यांच्या अनधिकृत बांधकामास एमआरटीपीची नोटीस      गडचिरोलीतील 1036 गावांनी घेतला नक्षल गावबंदीचा ठराव
...

मुख्य प्रशिक्षकपदी कुंबळे कायम राहणार

मुंबई, दि. ९ - कर्णधाराचा विरोध असला तरीही भारतीय क्रिकेट संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी माजी कर्णधार आणि जगद्विख्यात लेग स्पीनर अनिल कुंबळे यांना मुदतवाढ देण्याची क्रिकेट सल्लागार समितीची शिफारस असल्याचा दावा भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या सूत्रांनी केला आहे.

मास्तर ब्लास्टर सचिन तेंडुलकर, माजी कर्णधार सौरभ गांगुली आणि शैलीदार माजी फलंदाज व्ही व्ही व्ही एस लक्ष्मण यांचा समावेश असलेल्या सल्लागार समितीची बैठक गुरुवारी रात्री उशिरापर्यंत पार पडली. या बैठकीत कुंबळे यांना मुदतवाढ देण्याची शिफारस करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले. कुंबळे यांच्यासह माजी अष्टपैलू खेळाडू रवी शास्त्री हे देखील प्रशिक्षकपदाच्या शर्यतीत असून कर्णधार विराट कोहलीची शास्त्री यांच्या नावालाच पसंती असल्याचे सांगितले जाते.

सल्लागार समितीची बैठक नुकतीच पार पडली असून त्यामध्ये मुख्य प्रशिक्षक निवडीच्या प्रक्रियेबाबत चर्चा करण्यात आली. समितीने योग्य वेळी आपली शिफारस अहवाल बीसीसीआयकडे सुपूर्त करण्याचा निर्णय घेतला आहे; असे गुरुवारी रात्री उशिरा बीसीसीआयने प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे. मुख्य प्रशिक्षक पदावर कुंबळे अथवा ज्या कोणाची निवड होईल; त्यांच्याशी सन २०१९ मध्ये होणाऱ्या विश्वचषक स्पर्धेपर्यंत हे पद सांभाळण्यासाठी करार केला जाईल; असे बीसीसीआयचे प्रभारी अध्यक्ष सी के खन्ना यांनी सांगितले.

एकीकडे कुंबळे यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय संघाने चमकदार कामगिरी केली आहे. मात्र दुसरीकडे कर्णधाराचा कुंबळे यांच्या नावाला विरोध आहे. क्रिकेटचा संघ प्रत्यक्ष मैदानात कर्णधाराच्या नेतृत्वाखाली कामगिरी बजावीत असतो. त्यामुळे कर्णधाराच्या मताचा सन्मान करणेही आवश्यक आहे. अशा कात्रीत सल्लागार समिती आणि बीसीसीआय अडकली आहे.