ब्रेकिंग न्यूज
सावंतवाडी स्थानकाजवळ दुरांतो एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरले      इंडोनेशियात फटाक्यांच्या कारखान्याला आग, २३ ठार, ४३ जखमी      ताजमहालची सफाई करण्यापेक्षा योगींनी आपल्या पक्षातल्या लोकांची कलुषित मने स्वच्छ करावी : असदुद्दिन ओवैसी      महालक्ष्मी एक्स्प्रेस वर मध्यरात्री दरोडा, जेजुरी राजेवाडी स्टेशन येथील घटना, सिग्नल नादुरुस्त करून केली लूट      पर्यटनासाठी आलेल्या स्वित्झर्लंडच्या एका जोडप्याला उत्तर प्रदेशच्या फतेहपूर सीक्रीत एका टोळक्याने केली मारहाण      मुंबै बँकेकडून राधाकृष्ण विखे-पाटील यांना नियमबाह्य कर्ज? विखेंच्या डबघाईस आलेल्या कंपनीला 35 कोटींचं कर्ज.      मुंबई - छेडछाडीच्या भीतीने तरुणीने ट्रेनमधून उडी मारल्याचं प्रकरण, आरोपीला रेल्वे पोलिसांकडून अटक.      चंदू चव्हाण यांना तीन महिन्यांची शिक्षा, एलओसी ओलांडल्याप्रकरणी चंदू चव्हाण दोषी      अमिताभ बच्चन यांच्या अनधिकृत बांधकामास एमआरटीपीची नोटीस      गडचिरोलीतील 1036 गावांनी घेतला नक्षल गावबंदीचा ठराव
...

बीसीसीआयने कोहली नाही तर धवनसाठी मोजली अधिक रक्कम

नवी दिल्ली, दि. ९ (वृत्तसंस्था) - स्पॉन्सरशिपच्या माध्यमातून कमाईमध्ये भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली अव्वल असला तरी सलामीवीर शिखर धवनने कोहलीला बीसीसीआयकडून मिळालेल्या करमुक्त बक्षीस आणि मानधनामध्ये मागे टाकले आहे. धवनने २०१५-१६ या वर्षातील आंतरराष्ट्रीय सामन्यासाठी बीसीसीआयकडून मिळणाऱ्या करमुक्त कमाईमध्ये कोहलीपेक्षाही अधिक कमाई केल्याचे दिसते.

२५ लाखांहून अधिक रक्कम देय केलेल्या खेळाडूंची माहिती भारतीय क्रिकेटमंडळाने अधिकृत संकेतस्थळावरुन प्रसिद्ध केली आहे. यानुसार, डावखुरा सलामवीर शिखर धवन विराट कोहलीपेक्षा उजवा ठरला आहे. धवनसाठी बीसीसीआयने ८७.७६ लाख रुपये मोजले आहेत. विराटला मानधन आणि बक्षिस रकमेत ८३.०७ लाख रुपये मिळाले आहेत. या यादीत अजिंक्य रहाणे ८१.०६ लाख रुपये मिळवून तिसऱ्या स्थानावर असून, आर. अश्विन आणि रोहित शर्मा प्रत्येकी ७३.०२ लाख रुपये मिळवून संयुक्तरित्या चौथ्या स्थानावर आहेत. बीसीसीआयच्या बक्षिस आणि मानधनाच्या या यादीत वरुण अॅरॉनला सर्वात कमी भाव मिळाला आहे. त्याला केवळ ३२.१५ लाख रुपयांवर समाधान मानावे लागले.

बीसीसीआयकडून भारतीय संघातील खेळाडूंनी मागील सत्रात न्यूझीलंड, इग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यासोबत घरच्या मैदानावर खेळलेल्या सामन्यात मिळालेली बक्षिस स्वरुपातील रक्कम आणि आणि मानधन खेळाडूंना देण्यात आल्याचे बीसीसीआयने म्हटले आहे. यासोबतच आंतरराष्ट्रीय कसोटी क्रमवारीनुसार दिले जाणाऱ्या बक्षिसाची करमुक्त रक्कम देखील खेळाडूंना देय करण्यात आली आहे. आयपीएलमधील दुखापतीची भरपाई म्हणून बीसीसीआयने गोलंदाज आशिष नेहराला कोटी ५२ लाख रुपये मोजले आहेत. याशिवाय बीसीसीआय प्रशासकीय समितीच्या सदस्य डायना एडुल्डी यांच्यासह पाच महिला क्रिकेटर्संना प्रत्येकी ३० लाख रुपये देण्यात आले आहेत. यात अंजुम चोप्रा, नीतू डेविड, शुभांगी कुलकर्णी आणि सुधा शाह या महिला खेळाडूंचा समावेश आहे.