ब्रेकिंग न्यूज
सावंतवाडी स्थानकाजवळ दुरांतो एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरले      इंडोनेशियात फटाक्यांच्या कारखान्याला आग, २३ ठार, ४३ जखमी      ताजमहालची सफाई करण्यापेक्षा योगींनी आपल्या पक्षातल्या लोकांची कलुषित मने स्वच्छ करावी : असदुद्दिन ओवैसी      महालक्ष्मी एक्स्प्रेस वर मध्यरात्री दरोडा, जेजुरी राजेवाडी स्टेशन येथील घटना, सिग्नल नादुरुस्त करून केली लूट      पर्यटनासाठी आलेल्या स्वित्झर्लंडच्या एका जोडप्याला उत्तर प्रदेशच्या फतेहपूर सीक्रीत एका टोळक्याने केली मारहाण      मुंबै बँकेकडून राधाकृष्ण विखे-पाटील यांना नियमबाह्य कर्ज? विखेंच्या डबघाईस आलेल्या कंपनीला 35 कोटींचं कर्ज.      मुंबई - छेडछाडीच्या भीतीने तरुणीने ट्रेनमधून उडी मारल्याचं प्रकरण, आरोपीला रेल्वे पोलिसांकडून अटक.      चंदू चव्हाण यांना तीन महिन्यांची शिक्षा, एलओसी ओलांडल्याप्रकरणी चंदू चव्हाण दोषी      अमिताभ बच्चन यांच्या अनधिकृत बांधकामास एमआरटीपीची नोटीस      गडचिरोलीतील 1036 गावांनी घेतला नक्षल गावबंदीचा ठराव
...

भारताविरूद्धच्या सामन्यात खेळणार नाही एबी

लंडन, दि. १० (वृत्तसंस्था) - रविवारी ओव्हलच्या मैदानावर चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये भारत आणि दक्षिण अफ्रीका संघात निर्णायक सामना खेळवला जाणार असून टीम इंडियासाठी या सामन्याआधी गुड न्यूज असून या सामन्यासाठी दक्षिण आफ्रिकेचा विस्फोटक फलंदाज आणि कर्णधार .बी. डिव्हिलिअर्स पूर्णपणे फिट नसल्याचे वृत्त आहे.

डिव्हिलिअर्स पाकिस्तानविरोधात झालेल्या सामन्यामध्ये दुखापतग्रस्त झाला होता. त्याच्या पायाचे स्नायू क्षेत्ररक्षण करताना ताणले गेले होते, त्यानंतर थोड्यावेळासाठी त्याने मैदानही सोडले होते. रविवारच्या सामन्याआधी म्हणजे आज डिव्हिलिअर्सची फिटनेस टेस्ट घेतली जाणार आहे. क्रिकेट साउथ अफ्रीकेनेही डिव्हिलिअर्सची फिटनेस टेस्ट होणार असल्याचे स्पष्ट केल्यानंतर तो भारताविरुद्ध खेळणार की नाही हे स्पष्ट होईल. भारत आणि दक्षिण अफ्रीका संघांत रविवारी होणारा सामना दोन्ही संघांसाठी अत्यंत महत्वाचा असून हा सामना जिंकणा-या संघाचा उपांत्य फेरीतील प्रवेश नक्की होणार आहे तर पराभूत संघ मालिकेतून बाहेर पडेल.