ब्रेकिंग न्यूज
सावंतवाडी स्थानकाजवळ दुरांतो एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरले      इंडोनेशियात फटाक्यांच्या कारखान्याला आग, २३ ठार, ४३ जखमी      ताजमहालची सफाई करण्यापेक्षा योगींनी आपल्या पक्षातल्या लोकांची कलुषित मने स्वच्छ करावी : असदुद्दिन ओवैसी      महालक्ष्मी एक्स्प्रेस वर मध्यरात्री दरोडा, जेजुरी राजेवाडी स्टेशन येथील घटना, सिग्नल नादुरुस्त करून केली लूट      पर्यटनासाठी आलेल्या स्वित्झर्लंडच्या एका जोडप्याला उत्तर प्रदेशच्या फतेहपूर सीक्रीत एका टोळक्याने केली मारहाण      मुंबै बँकेकडून राधाकृष्ण विखे-पाटील यांना नियमबाह्य कर्ज? विखेंच्या डबघाईस आलेल्या कंपनीला 35 कोटींचं कर्ज.      मुंबई - छेडछाडीच्या भीतीने तरुणीने ट्रेनमधून उडी मारल्याचं प्रकरण, आरोपीला रेल्वे पोलिसांकडून अटक.      चंदू चव्हाण यांना तीन महिन्यांची शिक्षा, एलओसी ओलांडल्याप्रकरणी चंदू चव्हाण दोषी      अमिताभ बच्चन यांच्या अनधिकृत बांधकामास एमआरटीपीची नोटीस      गडचिरोलीतील 1036 गावांनी घेतला नक्षल गावबंदीचा ठराव
...

टीम इंडियाच्या गब्बरने तोडला सचिनचा हा रेकॉर्ड

ओव्हल, दि. १२ (वृत्तसंस्था) - टीम इंडियाने चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये दक्षिण आफ्रिकेवर दणदणीत विजय मिळवत सेमी फायनलमध्ये प्रवेश केला आहे. भारताला ओपनर बॅट्समन शिखर धवन याने खेळलेल्या धडाकेबाज खेळीमुळे सहजच विजय मिळाला. शिखर धवन याने ओव्हलच्या मैदानात दक्षिण आफ्रिकेविरुद्ध झालेल्या या मॅचमध्ये एक नवा रेकॉर्ड आपल्या नावावर केला आहे.

दक्षिण आफ्रिकेविरुद्ध आणखी एक धडाकेबाज खेळी करत शिखर धवनने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वात फास्ट एक हजार रन्स पूर्ण करण्याचा विक्रम आपल्या नावावर केला आहे. त्यामुळे शिखर धवनने मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर आणि सौरव गांगुली यांनाही मागे टाकलस आहे.

शिखर धवन याला आयसीसी टूर्नामेंट्समध्ये एक हजार रन्स बनवायला १६ इनिंग्स लागल्या. तर हाच रेकॉर्ड सचिन तेंडुलकरने १८ इनिंगमध्ये केला आहे. सौरव गांगुली, हर्षल गिब्स आणि मार्क वॉ यांना हा १०० रन्स करण्यासाठी २० इनिंग्स खेळाव्या लागल्या होत्या.

त्याचबरोबर शिखर धवनने चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये सर्वात जास्त हाफ सेंच्युरी म्हणजेच ५० रन्स बनवण्याच्या रेकॉर्डचीही बरोबरी केली आहे. चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये शिखर धवनने आत्तापर्यंत सहा हाफ सेंच्युरी केल्या आहेत. तर, राहुल द्रविड आणि सौरव गांगुली यांनीही चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये सहा हाफ सेंच्युरी केल्या आहेत.

शिखर धवनने २०१३ साली झालेल्या चॅम्पियन्स ट्रॉफीत मॅचेसमध्ये ९०.७५ च्या सरासरीने ३६३ रन्स केल्या होत्या. त्यामुळे तो त्यावेळच्या चॅम्पियन्स ट्रॉफीत सर्वाधिक रन्स करणारा प्लेयर ठरला होता. यंदाच्याही चॅम्पियन्स ट्रॉफीत शिखर धवनने आतापर्यंत झालेल्या तीन मॅचेसमध्ये २७१ रन्स केले आहेत. त्यामुळे तो पुन्हा एकदा चॅम्पियन्स ट्रॉफीत सर्वाधिक रन्स करण्याच्या शर्यतीत पहिला आहे.