ब्रेकिंग न्यूज
उल्हासनगर : रेल्वे स्टेशनबाहेर वडापावच्या दुकान मालकाला जिवंत जाळण्याचा प्रयत्न, चंदरलाल रामरखियानी 100 % भाजले      पाकिस्तानात बेपत्ता झालेले दोन्ही मौलवी भारतात परतले      बेळगावात ड्राय डेच्या दिवशी दारु न दिल्याने पोलिसांची हॉटेल मॅनेजरला लाथा-बुक्क्यांनी मारहाण      नागपूरमध्ये राजू शेट्टी यांचे स्टेट बँक इंडियाच्या कार्यालयाबाहेर आंदोलन      पतीची हत्या करुन मृतदेह बीएमडब्ल्यू गाडीत लपवला, पत्नीविरोधात गुन्हा दाखल, पंजाबमधील घटना      उत्तरप्रदेशमध्ये बहुजन समाज पक्षाचे नेते मोहम्मद समी यांची भररस्त्यात हत्या      छत्तीसगडमधील दंतेवाडामधूल पाच नक्षलवाद्यांकडून मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा हस्तगत      महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांना फसवणारा, जनतेला गाजर दाखवणारा अर्थसंकल्पः जयंत पाटील      जळगाव : शहरापासून जवळच असलेल्या भादली गावात मध्यरात्री एका कुटुंबातील चौघांची चोरटयांनी हत्या केली.      मुंबईने गमावला मतदानाचा अधिकार, ईशान्य भारतातील राज्यांना मिळाला BCCI मध्ये मतदानाचा हक्क
...

वेस्ट इंडिज दौऱ्यापर्यंत कुंबळेच्या हाती टीम इंडियाची कमान

मुंबई, दि. १३ - अनिल कुंबळेच आगामी वेस्ट इंडिज दौऱ्यापर्यंत टीम इंडियाचे मुख्य कोच राहतील, अशी माहिती सर्वोच्च न्यायालयाने नियुक्त केलेले बीसीसीआयचे सीओए विनोद राय यांनी सांगितले आहे. पण ही जबाबदारी अनिल कुंबळेने स्वीकारली तरच तो वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी भारताचा कोच राहिल, असेही राय म्हणाले आहेत.

टीम इंडिया चॅम्पियन्स ट्रॉफीनंतर वनडे आणि टी-२० खेळण्यासाठी वेस्ट इंडिजमध्ये जाणार आहे. चॅम्पियन्स ट्रॉफीनंतर कोच म्हणून अनिल कुंबळेचा करार संपणार होता. त्यामुळे बीसीसीआयने नवा कोच होण्यासाठी इच्छुक असणाऱ्यांना अर्ज पाठवायला सांगितले होते. या निवडीसाठी अनेकांनी अर्ज सादर केले होते. त्यात विरेंद्र सेहवाग याचाही समावेश होता. त्यामुळे ही लढत आणखीन रंजक होणार होती. त्यात टीम इंडियाचा कॅप्टन विराट कोहली याने कोचसाठी रवि शास्त्री यांच्या नावाची शिफारस केली होती. त्यामुळे चांगलाच गोंधळ उडाला होता.

या इच्छुकांचे सचिन तेंडुलकर, सौरव गांगुली आणि व्ही.व्ही.एस. लक्ष्मण यांची समिती मुलाखती घेणार होती. अनिल कुंबळेच्या कार्यपद्धतीवर काही भारतीय खेळाडू नाराज असल्याचेही बोलले जात असल्यामुळे आता वेस्ट इंडिज दौऱ्यानंतरच भारतीय क्रिकेट टीमच्या पूर्ण वेळ कोचची नियुक्ती होईल.