ब्रेकिंग न्यूज
सावंतवाडी स्थानकाजवळ दुरांतो एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरले      इंडोनेशियात फटाक्यांच्या कारखान्याला आग, २३ ठार, ४३ जखमी      ताजमहालची सफाई करण्यापेक्षा योगींनी आपल्या पक्षातल्या लोकांची कलुषित मने स्वच्छ करावी : असदुद्दिन ओवैसी      महालक्ष्मी एक्स्प्रेस वर मध्यरात्री दरोडा, जेजुरी राजेवाडी स्टेशन येथील घटना, सिग्नल नादुरुस्त करून केली लूट      पर्यटनासाठी आलेल्या स्वित्झर्लंडच्या एका जोडप्याला उत्तर प्रदेशच्या फतेहपूर सीक्रीत एका टोळक्याने केली मारहाण      मुंबै बँकेकडून राधाकृष्ण विखे-पाटील यांना नियमबाह्य कर्ज? विखेंच्या डबघाईस आलेल्या कंपनीला 35 कोटींचं कर्ज.      मुंबई - छेडछाडीच्या भीतीने तरुणीने ट्रेनमधून उडी मारल्याचं प्रकरण, आरोपीला रेल्वे पोलिसांकडून अटक.      चंदू चव्हाण यांना तीन महिन्यांची शिक्षा, एलओसी ओलांडल्याप्रकरणी चंदू चव्हाण दोषी      अमिताभ बच्चन यांच्या अनधिकृत बांधकामास एमआरटीपीची नोटीस      गडचिरोलीतील 1036 गावांनी घेतला नक्षल गावबंदीचा ठराव
...

वन-डे क्रमवारीत टीम इंडियाचा किंग कोहली अव्वल

नवी दिल्ली, दि. १४ (वृत्तसंस्था) - भारताचा सामना येत्या गुरुवारी चॅम्पियन्स करंडकात बांगलादेशविरुद्ध होणार असून पण भारतीय संघासाठी त्याआधीच एक चांगली बातमी आलेली आहे. भारताचा कर्णधार विराट कोहलीने आयसीसीच्या जागतिक क्रमवारीत पुन्हा एकदा पहिले स्थान पटकवले आहे.

वन-डे सामन्यांसाठी फलंदाजांची नवीन क्रमवारी आयसीसीने आज जाहीर केली. ज्यात विराट कोहलीने ऑस्ट्रेलियाच्या डेव्हिड वॉर्नरला मागे टाकत पहिला क्रमांक पटकावला आहे. विराट कोहली ८६२ गुणांसह पहिल्या क्रमांकावर असून डेव्हिड वॉर्नर अवघ्या एका गुणाच्या फरकाने दुसऱ्या क्रमांकावर आहे. चॅम्पियन्स करंडकातून भले दक्षिण अफ्रिकेचा संघ बाहेर पडला असला तरीही त्यांचा कर्णधार एबी डिव्हीलियर्सला आपल्या कामगिरीचे फळ मिळताना दिसत आहे. डिव्हीलियर्स ८४७ गुणांसह तिसऱ्या क्रमांकावर आहे. इंग्लिश फलंदाज जो रुट ७९८ गुणांसह चौथ्या तर न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यमसन ७७९ गुणांसह पाचव्या क्रमांकावर आहे.