ब्रेकिंग न्यूज
सावंतवाडी स्थानकाजवळ दुरांतो एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरले      इंडोनेशियात फटाक्यांच्या कारखान्याला आग, २३ ठार, ४३ जखमी      ताजमहालची सफाई करण्यापेक्षा योगींनी आपल्या पक्षातल्या लोकांची कलुषित मने स्वच्छ करावी : असदुद्दिन ओवैसी      महालक्ष्मी एक्स्प्रेस वर मध्यरात्री दरोडा, जेजुरी राजेवाडी स्टेशन येथील घटना, सिग्नल नादुरुस्त करून केली लूट      पर्यटनासाठी आलेल्या स्वित्झर्लंडच्या एका जोडप्याला उत्तर प्रदेशच्या फतेहपूर सीक्रीत एका टोळक्याने केली मारहाण      मुंबै बँकेकडून राधाकृष्ण विखे-पाटील यांना नियमबाह्य कर्ज? विखेंच्या डबघाईस आलेल्या कंपनीला 35 कोटींचं कर्ज.      मुंबई - छेडछाडीच्या भीतीने तरुणीने ट्रेनमधून उडी मारल्याचं प्रकरण, आरोपीला रेल्वे पोलिसांकडून अटक.      चंदू चव्हाण यांना तीन महिन्यांची शिक्षा, एलओसी ओलांडल्याप्रकरणी चंदू चव्हाण दोषी      अमिताभ बच्चन यांच्या अनधिकृत बांधकामास एमआरटीपीची नोटीस      गडचिरोलीतील 1036 गावांनी घेतला नक्षल गावबंदीचा ठराव
...

डीएसके टोयोटा स्पर्धेत आयफा स्काय हॉक्स, थंडरकॅटज संघांचे विजय

पुणे, दि. १५ - पुणे जिल्हा फुटबॉल संघटना (पीडीएफए) आयोजित डीएसके टोयोटा पुणे फुटबॉल लीग स्पर्धेत सुपर डिव्हिजन श्रेणी गटात आयफा स्काय हॉक्स, थंडरकॅटज या संघानी आपापल्या प्रतिस्पर्ध्यांचा पराभव करून आगेकूच केली.

बीईजी फुटबॉल मैदान, डीएसके लोणी येथील फुटबॉल मैदानवर सुरू असलेल्या या स्पर्धेत साखळी फेरीत पहिल्या सामन्यात थंडरकॅटज संघाने संगम यंग बॉईजचा ४-० असा पराभव केला. विजयी संघाकडून अक्षय नायरने दोन गोल तर, आदित्य मचाले, रोहित जयसिंघानी यांनी प्रत्येकी एक गोल केला. अन्य लढतीत ईशान शमा याने नोंदवलेल्या हॅट्ट्रिक कामगिरीच्या जोरावर आयफा स्काय हॉक्स संघाने फिनिक्स एससीचा ५-० असा सहज पराभव केला. डेक्कन रोव्हर्स एफसी बिशप्स एफसी यांच्यातील सामना २-२ असा बरोबरीत सुटला.

डेक्कन रोव्हर्स एफसी - (रित्विक भंडारी १०, १७ मि.) बरोबरी वि. बिशप्स एफसी: (चेतन पाटील २० मि. सोमीनजत टी. २८ मि.);

थंडरकॅटज - (अक्षय नायर ३०,५३, मि.आदित्य मचाले ३७ मि. रोहित जयसिंघानी ४२ मि.) वि.वि.संगम यंग बॉईज: ;

आयफा स्काय हॉक्स: (ईशान शमा , ३१, ७० मि. स्वतेज व्ही. ५२ मि. साहिल शेख ६७ मि) वि.वि.फिनिक्स एससी: .