ब्रेकिंग न्यूज
सावंतवाडी स्थानकाजवळ दुरांतो एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरले      इंडोनेशियात फटाक्यांच्या कारखान्याला आग, २३ ठार, ४३ जखमी      ताजमहालची सफाई करण्यापेक्षा योगींनी आपल्या पक्षातल्या लोकांची कलुषित मने स्वच्छ करावी : असदुद्दिन ओवैसी      महालक्ष्मी एक्स्प्रेस वर मध्यरात्री दरोडा, जेजुरी राजेवाडी स्टेशन येथील घटना, सिग्नल नादुरुस्त करून केली लूट      पर्यटनासाठी आलेल्या स्वित्झर्लंडच्या एका जोडप्याला उत्तर प्रदेशच्या फतेहपूर सीक्रीत एका टोळक्याने केली मारहाण      मुंबै बँकेकडून राधाकृष्ण विखे-पाटील यांना नियमबाह्य कर्ज? विखेंच्या डबघाईस आलेल्या कंपनीला 35 कोटींचं कर्ज.      मुंबई - छेडछाडीच्या भीतीने तरुणीने ट्रेनमधून उडी मारल्याचं प्रकरण, आरोपीला रेल्वे पोलिसांकडून अटक.      चंदू चव्हाण यांना तीन महिन्यांची शिक्षा, एलओसी ओलांडल्याप्रकरणी चंदू चव्हाण दोषी      अमिताभ बच्चन यांच्या अनधिकृत बांधकामास एमआरटीपीची नोटीस      गडचिरोलीतील 1036 गावांनी घेतला नक्षल गावबंदीचा ठराव
...

पाकिस्तानचा कर्णधार सापडला मॅच फिक्सिंगच्या फेऱ्यात

नवी दिल्ली, दि. १६ (वृत्तसंस्था) - बाहुबली टीम इंडिया आणि पाकिस्तान या दोन पारंपरिक प्रतिस्पर्ध्यांमध्ये इंग्लंडच्या रणभूमीवरमहायुद्धहोणार असून पाकिस्तान संघाचा सेनापती अर्थात कर्णधार सरफराज अहमदवर प्रत्यक्ष रणभूमीवर उतरण्याआधीचमॅच फिक्सिंगच्या संशयाचे काळे ढग दाटून आले असून तसा संशय पाकिस्तानचा माजी खेळाडू आमिर सोहेलने व्यक्त केला आहे.

इंग्लंड आणि पाकिस्तानमध्ये आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीतील पहिल्या उपांत्य फेरीची लढत झाली. पाकिस्तानने त्यात जबरदस्त खेळ करून इंग्लंडला पराभवाची धूळ चारली आणि फायनलमध्ये धडक दिली. आता पाकिस्तानची टक्कर बलाढ्य भारतीय संघासोबत होणार आहे. पाकिस्तानचा कर्णधार सरफराज अहमद चॅम्पियन्स ट्रॉफीतील या फायनल लढतीआधीचमॅच फिक्सिंगच्या फेऱ्यात सापडला असून तसा संशय पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू आमिर सोहेल याने व्यक्त केला आहे. तू काहीही कमाल केली नाहीस. कुणीतरी तुम्हाला मॅच जिंकून दिली आहे. तू जास्त हुरळून जाऊ नकोस. काय घडले आहे, काय घडते आहे हे आम्हाला चांगलेच ठाऊक आहे, असे सोहेल म्हणाला आहे.

सरफराज सोहेलने अशा प्रकारे संशय व्यक्त केल्याने संशयाच्या घेऱ्यात सापडला आहे. सामना कुणी जिंकून दिला हे विचारू नका. ‘दुआआणिअल्ला-तालाने सामना जिंकून दिला आहे. सामना जिंकून देण्यात कुणाचा हात आहे, हे मी आता सांगणार नाही. यात तू काही कमाल केली नाही, हे सरफराजला सांगण्याची गरज आहे, असे म्हणून सोहेलने पाकिस्तानी खेळाडूंच्या खेळावरच शंका उपस्थित केली आहे. तुमचे डोके ठिकाणावर राहू द्या. डोक्यावर बसण्याची गरज नाही. तुमची पात्रता काय आहे, हे आम्हाला माहित आहे. तोंड बंद ठेवून तुम्ही तुमचे काम करा. तुम्ही काही चुकीचे करत असाल तर ती चूक दाखवून देणे हे आमचे काम आहे. तुम्ही चांगले कराल तर त्याचे कौतुकही आम्ही करू. तुम्ही चांगला खेळ करत आहात आणि तुमच्याकडून काही चूक होत असेल तर त्यावर आम्ही फार काही बोलणार नाही. तुमचं डोकं ठिकाणावर राहू द्या, असं सोहेलनं सरफराजसह पाकिस्तानी संघातील खेळाडूंना सुनावले आहे.