ब्रेकिंग न्यूज
सावंतवाडी स्थानकाजवळ दुरांतो एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरले      इंडोनेशियात फटाक्यांच्या कारखान्याला आग, २३ ठार, ४३ जखमी      ताजमहालची सफाई करण्यापेक्षा योगींनी आपल्या पक्षातल्या लोकांची कलुषित मने स्वच्छ करावी : असदुद्दिन ओवैसी      महालक्ष्मी एक्स्प्रेस वर मध्यरात्री दरोडा, जेजुरी राजेवाडी स्टेशन येथील घटना, सिग्नल नादुरुस्त करून केली लूट      पर्यटनासाठी आलेल्या स्वित्झर्लंडच्या एका जोडप्याला उत्तर प्रदेशच्या फतेहपूर सीक्रीत एका टोळक्याने केली मारहाण      मुंबै बँकेकडून राधाकृष्ण विखे-पाटील यांना नियमबाह्य कर्ज? विखेंच्या डबघाईस आलेल्या कंपनीला 35 कोटींचं कर्ज.      मुंबई - छेडछाडीच्या भीतीने तरुणीने ट्रेनमधून उडी मारल्याचं प्रकरण, आरोपीला रेल्वे पोलिसांकडून अटक.      चंदू चव्हाण यांना तीन महिन्यांची शिक्षा, एलओसी ओलांडल्याप्रकरणी चंदू चव्हाण दोषी      अमिताभ बच्चन यांच्या अनधिकृत बांधकामास एमआरटीपीची नोटीस      गडचिरोलीतील 1036 गावांनी घेतला नक्षल गावबंदीचा ठराव
...

भारतीय हॉकी संघाने पाकला धुतले

नवी दिल्ली, दि. १९ (वृत्तसंस्स्था) - क्रिकेटच्या मैदानावर पाकिस्ताननं भारतीय संघाची पार दाणादाण उडवली असली, तरी हॉकीमध्ये भारताच्या वीरांनी पाकवर जबरदस्त सर्जिकल स्ट्राइक करून देशवासीयांच्या दुःखावर फुंकर घातली आहे. त्यांच्या या दणदणीत विजयाचं करावं तेवढं कौतुक थोडंच आहे. पण, त्यांनी आणखी एक अशी कृती केलीय की, ती कळल्यावर त्यांच्याबद्दलचं प्रेम, अभिमान नक्कीच दुणावेल.

हॉकी वर्ल्ड लीग स्पर्धेत कालच्या पाकविरुद्धच्या सामन्यात भारतीय संघ दंडावर काळ्या फिती बांधून मैदानावर उतरला होता. त्या नेमक्या कशासाठी आहेत, कशाच्या निषेधार्थ आहेत, हे कुणालाच ठाऊक नव्हतं. परंतु, ते जेव्हा समोर आलं, तेव्हा भारतीयांची मान उंचावली आणि पाकिस्तानची शरमेनं खाली गेली. पाकिस्तानी सैन्याकडून काश्मीरमध्ये होत असलेल्या भ्याड हल्ल्यांचा निषेध म्हणून भारतीय हॉकीपटूंनी या काळ्या फिती लावल्या होत्या. देशाबद्दलचा, लष्करी जवानांबद्दलचा आदर व्यक्त करण्यासाठी भारतीय खेळाडू आणि सपोर्ट स्टाफने एकमताने हा निर्णय घेतला होता.

अर्थात, भारतीय हॉकी संघानं आपली राष्ट्रनिष्ठा व्यक्त करण्याची ही पहिलीच Posted On: 19 June 2017