ब्रेकिंग न्यूज
सावंतवाडी स्थानकाजवळ दुरांतो एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरले      इंडोनेशियात फटाक्यांच्या कारखान्याला आग, २३ ठार, ४३ जखमी      ताजमहालची सफाई करण्यापेक्षा योगींनी आपल्या पक्षातल्या लोकांची कलुषित मने स्वच्छ करावी : असदुद्दिन ओवैसी      महालक्ष्मी एक्स्प्रेस वर मध्यरात्री दरोडा, जेजुरी राजेवाडी स्टेशन येथील घटना, सिग्नल नादुरुस्त करून केली लूट      पर्यटनासाठी आलेल्या स्वित्झर्लंडच्या एका जोडप्याला उत्तर प्रदेशच्या फतेहपूर सीक्रीत एका टोळक्याने केली मारहाण      मुंबै बँकेकडून राधाकृष्ण विखे-पाटील यांना नियमबाह्य कर्ज? विखेंच्या डबघाईस आलेल्या कंपनीला 35 कोटींचं कर्ज.      मुंबई - छेडछाडीच्या भीतीने तरुणीने ट्रेनमधून उडी मारल्याचं प्रकरण, आरोपीला रेल्वे पोलिसांकडून अटक.      चंदू चव्हाण यांना तीन महिन्यांची शिक्षा, एलओसी ओलांडल्याप्रकरणी चंदू चव्हाण दोषी      अमिताभ बच्चन यांच्या अनधिकृत बांधकामास एमआरटीपीची नोटीस      गडचिरोलीतील 1036 गावांनी घेतला नक्षल गावबंदीचा ठराव
...

आयसीसी टी-२० विश्वचषक स्पर्धा पुढच्या वर्षी होणार नाही

लंडन, दि. १९ (वृत्तसंस्था) - २०१८मध्ये होणारी आयसीसी टी-20 विश्व चषक स्पर्धा रद्द झाली असून ही स्पर्धा २०२०मध्ये आयोजित केली जाणार आहे. कारण, बहुतेक मुख्य संघ वेगळ्या स्पर्धांमध्ये २०१८मध्ये व्यस्त आहेत. आयसीसीच्या वरिष्ठ सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आयसीसी टी-२० विश्व चषक स्पर्धा ही २०२० मध्ये होईल, मात्र याचे स्थळ अद्याप निश्चित करण्यात आलेले नाही.

आयसीसीच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, २०२०मध्ये आयसीसी टी-२० विश्व चषक होणार आहे. कदाचित हा विश्व चषक साऊथ आफ्रिका किंवा ऑस्ट्रेलियामध्ये होऊ शकतो. अनेक टीम्स या द्विपक्षीय स्पर्धांमध्ये व्यस्त आहेत. त्यासोबतच आयसीसीच्या इतरही स्पर्धा होत असल्याने या स्पर्धेचे सदस्य असलेल्या देशांनी आम्हाला वेळ हवा असे सांगितले आहे.