ब्रेकिंग न्यूज
सावंतवाडी स्थानकाजवळ दुरांतो एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरले      इंडोनेशियात फटाक्यांच्या कारखान्याला आग, २३ ठार, ४३ जखमी      ताजमहालची सफाई करण्यापेक्षा योगींनी आपल्या पक्षातल्या लोकांची कलुषित मने स्वच्छ करावी : असदुद्दिन ओवैसी      महालक्ष्मी एक्स्प्रेस वर मध्यरात्री दरोडा, जेजुरी राजेवाडी स्टेशन येथील घटना, सिग्नल नादुरुस्त करून केली लूट      पर्यटनासाठी आलेल्या स्वित्झर्लंडच्या एका जोडप्याला उत्तर प्रदेशच्या फतेहपूर सीक्रीत एका टोळक्याने केली मारहाण      मुंबै बँकेकडून राधाकृष्ण विखे-पाटील यांना नियमबाह्य कर्ज? विखेंच्या डबघाईस आलेल्या कंपनीला 35 कोटींचं कर्ज.      मुंबई - छेडछाडीच्या भीतीने तरुणीने ट्रेनमधून उडी मारल्याचं प्रकरण, आरोपीला रेल्वे पोलिसांकडून अटक.      चंदू चव्हाण यांना तीन महिन्यांची शिक्षा, एलओसी ओलांडल्याप्रकरणी चंदू चव्हाण दोषी      अमिताभ बच्चन यांच्या अनधिकृत बांधकामास एमआरटीपीची नोटीस      गडचिरोलीतील 1036 गावांनी घेतला नक्षल गावबंदीचा ठराव
...

टीम इंडियाच्या पराभवानंतर हार्दिक पांड्याची पहिली प्रतिक्रिया

लंडन, दि. १९ (वृत्तसंस्था) - चॅम्पियन्स ट्रॉफीच्या फायनलमध्ये लाजिरवाणा पराभव स्वीकारावा लागलेल्या भारतीय संघावर सर्वच स्तरातून टीका होत आहे. पण याचवेळी भारताच्या हार्दिक पांड्यानं कोट्यवधी चाहत्यांची मनं मात्र जिंकून घेतली. भारताचे जबरदस्त फलंदाज पाकिस्तानी गोलंदाजीसमोर ढेपाळत असताना हार्दिक पांड्यानं मात्र एकवेळ सामन्यात अक्षरश: जान आणली होती. फलंदाजी कशी करायची हेही त्यानं सर्व आघाडीच्या फलंदाजांना दाखवून दिलं. पण जाडेजाच्या एका छोट्याशा चुकीमुळे पांड्याला आपली विकेट गमवावी लागली. अन् इथंच भारतानं सामनाही गमावला.

अवघ्या ४३ चेंडूत ७६ धावा फटकावणाऱ्या पांड्यानं तुफानी फटकेबाजी करत टीम इंडियाची लाज राखली. दरम्यान, या पराभवानंतर पांड्यानं पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली आहे. या सामन्यानंतर पांड्या एवढा हताश होता की, त्यानं पहाटे  वाजता (इंग्लंडमधील वेळेनुसार) एक ट्वीट केला. या ट्वीटमध्ये पांड्यानं आपल्या भावनांना वाट मोकळी करुन दिली.

चॅम्पियन्स ट्रॉफी २०१७ भारतीय संघासाठी एक उत्कृष्ट अनुभव होता. आम्ही आमचा सर्वोत्कृष्ट खेळ करण्याचा प्रयत्न केला. तुमच्या सगळ्यांचे मेसेज आणि पाठिंब्यासाठी धन्यवाद.’