ब्रेकिंग न्यूज
सावंतवाडी स्थानकाजवळ दुरांतो एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरले      इंडोनेशियात फटाक्यांच्या कारखान्याला आग, २३ ठार, ४३ जखमी      ताजमहालची सफाई करण्यापेक्षा योगींनी आपल्या पक्षातल्या लोकांची कलुषित मने स्वच्छ करावी : असदुद्दिन ओवैसी      महालक्ष्मी एक्स्प्रेस वर मध्यरात्री दरोडा, जेजुरी राजेवाडी स्टेशन येथील घटना, सिग्नल नादुरुस्त करून केली लूट      पर्यटनासाठी आलेल्या स्वित्झर्लंडच्या एका जोडप्याला उत्तर प्रदेशच्या फतेहपूर सीक्रीत एका टोळक्याने केली मारहाण      मुंबै बँकेकडून राधाकृष्ण विखे-पाटील यांना नियमबाह्य कर्ज? विखेंच्या डबघाईस आलेल्या कंपनीला 35 कोटींचं कर्ज.      मुंबई - छेडछाडीच्या भीतीने तरुणीने ट्रेनमधून उडी मारल्याचं प्रकरण, आरोपीला रेल्वे पोलिसांकडून अटक.      चंदू चव्हाण यांना तीन महिन्यांची शिक्षा, एलओसी ओलांडल्याप्रकरणी चंदू चव्हाण दोषी      अमिताभ बच्चन यांच्या अनधिकृत बांधकामास एमआरटीपीची नोटीस      गडचिरोलीतील 1036 गावांनी घेतला नक्षल गावबंदीचा ठराव
...

आजपासून ऑस्ट्रेलिया ओपन, श्रीकांत सज्ज

सिडनी, दि. २० (वृत्तसंस्था) - इंडोनेशिया ओपन स्पर्धा जिंकणारा भारताचा किदाम्बी श्रीकांत आता आजपासून (मंगळवार) सुरू होणाऱ्या ऑस्ट्रेलिया ओपन सुपर सीरिज बॅडमिंटन स्पर्धेसाठी सज्ज झाला आहे. दुसरीकडे, गतविजेत्या साईना नेहवालकडून या स्पर्धेत चमकदार कामगिरीची अपेक्षा आहे.
पहिल्या दिवशी पात्रता फेरीच्या लढती होतील. यानंतर बुधवारी मुख्य फेरीत श्रीकांतची सलामीची लढत पात्रता फेरीतून आलेल्या खेळाडूशी होईल. मात्र, दुसऱ्या फेरीत त्याच्यासमोर अग्रमानांकित सन वान हो याचे आव्हान असणार आहे. श्रीकांत म्हणाला, ‘वर्ल्ड चॅम्पियनशिपपूर्वीची शेवटची स्पर्धा म्हणजे ऑस्ट्रेलियन ओपन. त्यामुळे या स्पर्धेकडे मी सकारात्मक पद्धतीने बघत आहे. इंडोनेशिया ओपनच्या विजेतेपदाने माझा आत्मविश्वास वाढला आहे. ऑस्ट्रेलियन ओपनमध्येही मी शंभर टक्के योगदान देण्याचा प्रयत्न करणार आहे. आशा आहे, या स्पर्धेतही चमकदार कामगिरी होईल.’ एच. एस. प्रणॉयच्या कामगिरीवरही लक्ष असणार आहे. त्याने चाँग वेई ली आणि चेन लाँगसारख्या अव्वल खेळाडूंना इंडोनेशिया ओपनमध्ये पराभवाचा धक्का दिला होता. बी. साई प्रणीत, अजय जयराम हे मुख्य फेरीत असतील, तर पारुपल्ली कश्यप, सिरिल वर्मा, श्रेयांश जैस्वाल पात्रता फेरीत खेळतील.
महिला एकेरीत पी. व्ही. सिंधूला पाचवे मानांकन असून, तिची सलामीची लढत जपानच्या सायाका सातोविरुद्ध होणार आहे. साईनाची पहिल्याच फेरीत कसोटी लागणार आहे. बिगरमानांकित साईनाची लढत चौथ्या मानांकित सुंग जी ह्यूनविरुद्ध होईल. सध्या ह्यून जागतिक क्रमवारीत पाचव्या स्थानी आहे. साईना आणि ह्यून यापूर्वी आठ वेळा आमनेसामने आल्या आहेत. यातील सहा लढती साईनाने जिंकल्या आहेत. मात्र, मागील काही स्पर्धांमध्ये साईनाची कामगिरी मनासारखी होत नाही आहे. इंडोनेशिया ओपनमध्ये सिंधू, साईनाला चमकदार कामगिरी करता आली नव्हती. तेव्हा या वेळी त्यांच्या कामगिरीकडे साऱ्यांचे लक्ष असणार आहे. पुरुष दुहेरीत फ्रान्सिस अल्विन-कोणा तरुण, सात्विकसाईराज रांकिरेड्डी-चिराग शेट्टी, मनू अत्रीबी. सुमीत रेड्डी, महिला दुहेरीत अश्विनी पोनप्पा-एन. सिक्की रेड्डी, अश्विनी-सात्विकसाईराज या जोडी सहभागी होत आहेत
.