ब्रेकिंग न्यूज
सावंतवाडी स्थानकाजवळ दुरांतो एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरले      इंडोनेशियात फटाक्यांच्या कारखान्याला आग, २३ ठार, ४३ जखमी      ताजमहालची सफाई करण्यापेक्षा योगींनी आपल्या पक्षातल्या लोकांची कलुषित मने स्वच्छ करावी : असदुद्दिन ओवैसी      महालक्ष्मी एक्स्प्रेस वर मध्यरात्री दरोडा, जेजुरी राजेवाडी स्टेशन येथील घटना, सिग्नल नादुरुस्त करून केली लूट      पर्यटनासाठी आलेल्या स्वित्झर्लंडच्या एका जोडप्याला उत्तर प्रदेशच्या फतेहपूर सीक्रीत एका टोळक्याने केली मारहाण      मुंबै बँकेकडून राधाकृष्ण विखे-पाटील यांना नियमबाह्य कर्ज? विखेंच्या डबघाईस आलेल्या कंपनीला 35 कोटींचं कर्ज.      मुंबई - छेडछाडीच्या भीतीने तरुणीने ट्रेनमधून उडी मारल्याचं प्रकरण, आरोपीला रेल्वे पोलिसांकडून अटक.      चंदू चव्हाण यांना तीन महिन्यांची शिक्षा, एलओसी ओलांडल्याप्रकरणी चंदू चव्हाण दोषी      अमिताभ बच्चन यांच्या अनधिकृत बांधकामास एमआरटीपीची नोटीस      गडचिरोलीतील 1036 गावांनी घेतला नक्षल गावबंदीचा ठराव
...

मला कुंबळे प्रशिक्षक म्हणून नको आहे – कोहली

लंडन, दि. २० (वृत्तसंस्था) - कोहली आणि प्रशिक्षक कुंबळे यांच्यातील वादाला चॅंपियन्स करंडक क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम फेरीतील पराभवानंतर पुन्हा एकदा नव्याने तोंड फुटले आहे. खरच प्रशिक्षक म्हणून कर्णधार कोहलीला कुंबळे नको आहेत आणि त्याने तसे स्पष्टपणे भारतीय क्रिकेट मंडळाच्या सल्लागार समितीला सांगितले आहे.

याबाबत एका दैनिकाने दिलेल्या वृत्तानुसार, कर्णधार विराट कोहलीने अंतिम सामन्यापूर्वी शनिवारी सल्लागार समितीची भेट घेऊन त्यांच्यासमोर कुंबळेविरोधातील आपली भूमिका मांडल्याचे म्हणण्यात आले आहे. आता सचिन, गांगुली आणि लक्ष्मण या सल्लागार समितीसमोरील प्रशिक्षक निवडीचा प्रश् कोहलीच्या या भूमिकेनंतर गंभीर बनला आहे. कोहलीने समितीची भेट घेतली तेव्हा बीसीसीआयचे हंगामी सचिव अमिताभ चौधरी, मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल जोहरी, व्यवस्थापक एम. व्ही. श्रीधर हेदेखील उपस्थित होते. कोहलीच्या भूमिकेनंतर आता सल्लागार समिती कुंबळेशी चर्चा करणार आहे.

याबाबत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार प्रशिक्षक कुंबळे यांच्याविरुद्ध कोहलीने जवळपास तक्रारीच केल्याचे समजते. कोहलीची आक्रमकता पाहून आता हा वाद सामंजस्याने मिटेल असे वाटत नाही, असेही या सूत्राने सांगितले. विशेष म्हणजे केवळ कोहलीच नाही, तर संघातील अन्य काही खेळाडूदेखील कुंबळे यांच्या कार्यपद्धतीवर नाराज असल्याचे समजते.