ब्रेकिंग न्यूज
उल्हासनगर : रेल्वे स्टेशनबाहेर वडापावच्या दुकान मालकाला जिवंत जाळण्याचा प्रयत्न, चंदरलाल रामरखियानी 100 % भाजले      पाकिस्तानात बेपत्ता झालेले दोन्ही मौलवी भारतात परतले      बेळगावात ड्राय डेच्या दिवशी दारु न दिल्याने पोलिसांची हॉटेल मॅनेजरला लाथा-बुक्क्यांनी मारहाण      नागपूरमध्ये राजू शेट्टी यांचे स्टेट बँक इंडियाच्या कार्यालयाबाहेर आंदोलन      पतीची हत्या करुन मृतदेह बीएमडब्ल्यू गाडीत लपवला, पत्नीविरोधात गुन्हा दाखल, पंजाबमधील घटना      उत्तरप्रदेशमध्ये बहुजन समाज पक्षाचे नेते मोहम्मद समी यांची भररस्त्यात हत्या      छत्तीसगडमधील दंतेवाडामधूल पाच नक्षलवाद्यांकडून मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा हस्तगत      महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांना फसवणारा, जनतेला गाजर दाखवणारा अर्थसंकल्पः जयंत पाटील      जळगाव : शहरापासून जवळच असलेल्या भादली गावात मध्यरात्री एका कुटुंबातील चौघांची चोरटयांनी हत्या केली.      मुंबईने गमावला मतदानाचा अधिकार, ईशान्य भारतातील राज्यांना मिळाला BCCI मध्ये मतदानाचा हक्क
...

युवराज आणि धोनीबाबत निर्णय घेण्याची वेळ - राहुल द्रविड

मुंबई, दि. २१ – २०१९ चा विश्वचषक पाहता युवराज सिंह आणि महेंद्र सिंह धोनी यांची भारतीय संघातील भूमिका काय, याबाबत निर्णय घेण्याची वेळ आली आहे, असं मत टीम इंडियाचा माजी कर्णधार राहुल द्रविडने व्यक्त केलं आहे. निवड समिती आणि व्यवस्थापनाने याबाबत निर्णय घेतला पाहिजे, असं राहुल द्रविडने एएसपीएनशी बोलताना सांगितलं. चॅम्पियन्स ट्रॉफीत चार आणि पाच क्रमांकावर फलंदाजी करणाऱ्या युवराज आणि धोनीच्या भूमिकेविषयी द्रविडला विचारण्यात आलं होतं.

भारतीय क्रिकेटचं भवितव्य म्हणून ते (निवड समिती) काही विचार करत आहेत का? पुढच्या काही वर्षांमध्ये या दोघांची (युवराज, धोनी) संघात भूमिका काय आहे? दोघांनाही संघात जागा आहे का? किंवा एखाद्यालाही संघात जागा आहे का?, असा सवाल द्रविडने केला आहे.

वर्ष किंवा सहा महिन्यात तुम्हाला (निवड समिती आणि व्यवस्थापन) पुनर्मुल्यांकन करण्याची इच्छा आहे का? या दोन खेळाडूंना संधी देण्यापूर्वी सध्या उपलब्ध असलेल्या कौशल्यवान खेळाडूंकडे पाहण्याची आणि त्यांची कामगिरी पाहण्याची इच्छा आहे का, असा सवालही द्रविडने केला.

आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीनंतर टीम इंडिया वेस्ट इंडिजला रवाना झाली आहे. या मालिकेतला पहिला वन डे शुक्रवारी खेळवला जाणार आहे. या मालिकेत युवा खेळाडूंना अंतिम ११ मध्ये जास्तीत जास्त संधी मिळावी, अशी इच्छा द्रविडने व्यक्त केली.