ब्रेकिंग न्यूज
उल्हासनगर : रेल्वे स्टेशनबाहेर वडापावच्या दुकान मालकाला जिवंत जाळण्याचा प्रयत्न, चंदरलाल रामरखियानी 100 % भाजले      पाकिस्तानात बेपत्ता झालेले दोन्ही मौलवी भारतात परतले      बेळगावात ड्राय डेच्या दिवशी दारु न दिल्याने पोलिसांची हॉटेल मॅनेजरला लाथा-बुक्क्यांनी मारहाण      नागपूरमध्ये राजू शेट्टी यांचे स्टेट बँक इंडियाच्या कार्यालयाबाहेर आंदोलन      पतीची हत्या करुन मृतदेह बीएमडब्ल्यू गाडीत लपवला, पत्नीविरोधात गुन्हा दाखल, पंजाबमधील घटना      उत्तरप्रदेशमध्ये बहुजन समाज पक्षाचे नेते मोहम्मद समी यांची भररस्त्यात हत्या      छत्तीसगडमधील दंतेवाडामधूल पाच नक्षलवाद्यांकडून मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा हस्तगत      महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांना फसवणारा, जनतेला गाजर दाखवणारा अर्थसंकल्पः जयंत पाटील      जळगाव : शहरापासून जवळच असलेल्या भादली गावात मध्यरात्री एका कुटुंबातील चौघांची चोरटयांनी हत्या केली.      मुंबईने गमावला मतदानाचा अधिकार, ईशान्य भारतातील राज्यांना मिळाला BCCI मध्ये मतदानाचा हक्क
...

कोहलीने केली कुंबळेला शिवीगाळ, प्रशिक्षकपदाचा कुंबळे राजीनामा

मुंबई, दि. २१ - टीम इंडियाचा माजी मुख्य प्रशिक्षक अनिल कुंबळे यांनं राजीनामा दिल्यावर आता एक भारतीय क्रिकेटच्या इतिहासाला बट्टा लावणारी घटना पुढे आली आहे. चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम सामन्याच्या आधी कुंबळे आणि विराट कोहली यांच्या जोरदार भांडण झालं. यावेळी कोहलीनं कुंबळेंना शिवीगाळ केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. कोहलीनं वापरलेल्या अपशब्दांमुळे अनिल कुंबळेंचा संताप झाला. आणि गेले अनेक महिने सुरू असलेला संघर्ष चव्हाटयावर आला.

कुंबळेंनी दिलेल्या राजीनामा पत्रात त्यांनी आपली नाराजी स्पष्ट शब्दात व्यक्त केली आहे. मी हेड कोच म्हणून काम करण्यावर विराट कोहलीचा आक्षेप होता. विराटला माझी कार्यपद्धती आवडत नव्हती. बीसीसीआयनं याबाबत मला सांगितलं. बीसीसीआयनं समझोता घडवण्याचा प्रयत्न केला. मात्र असं खूप दिवस चालणार नाही. त्यानंतर मी राजीनामा देण्याचा निर्णय घेतल्याचं अनिल कुंबळेनं पत्रात स्पष्ट केलं आहे.