ब्रेकिंग न्यूज
सावंतवाडी स्थानकाजवळ दुरांतो एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरले      इंडोनेशियात फटाक्यांच्या कारखान्याला आग, २३ ठार, ४३ जखमी      ताजमहालची सफाई करण्यापेक्षा योगींनी आपल्या पक्षातल्या लोकांची कलुषित मने स्वच्छ करावी : असदुद्दिन ओवैसी      महालक्ष्मी एक्स्प्रेस वर मध्यरात्री दरोडा, जेजुरी राजेवाडी स्टेशन येथील घटना, सिग्नल नादुरुस्त करून केली लूट      पर्यटनासाठी आलेल्या स्वित्झर्लंडच्या एका जोडप्याला उत्तर प्रदेशच्या फतेहपूर सीक्रीत एका टोळक्याने केली मारहाण      मुंबै बँकेकडून राधाकृष्ण विखे-पाटील यांना नियमबाह्य कर्ज? विखेंच्या डबघाईस आलेल्या कंपनीला 35 कोटींचं कर्ज.      मुंबई - छेडछाडीच्या भीतीने तरुणीने ट्रेनमधून उडी मारल्याचं प्रकरण, आरोपीला रेल्वे पोलिसांकडून अटक.      चंदू चव्हाण यांना तीन महिन्यांची शिक्षा, एलओसी ओलांडल्याप्रकरणी चंदू चव्हाण दोषी      अमिताभ बच्चन यांच्या अनधिकृत बांधकामास एमआरटीपीची नोटीस      गडचिरोलीतील 1036 गावांनी घेतला नक्षल गावबंदीचा ठराव
...

२ जुलैला पुन्हा एकदा रंगणार महामुकाबला

नवी दिल्ली, दि. २२ (वृत्तसंस्था) - चॅम्पियन्स ट्रॉफीतील भारत पाकिस्तान सामन्यानंतर पुन्हा एकदा क्रिकेट वर्तुळात भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामन्याची चर्चा रंगताना दिसत असून इंग्लंडच्या मैदानातून २४ जूनपासून महिला क्रिकेट विश्वचषकाला सुरुवात होत आहे. एकूण आठ संघ या स्पर्धेत सहभागी होणार असून साखळी सामन्यात प्रत्येक संघ एकमेकांशी भिडणार असल्यामुळे प्रत्येक संघ या स्पर्धेत सात सामने खेळेल.

या स्पर्धेतील भारतीय महिलांचा पहिला सामना हा इंग्लंडच्या महिलांसोबत खेळवण्यात येईल. पण या सामन्यापेक्षा जूलैला भारत- पाकिस्तान यांच्यात होणाऱ्या सामन्याची चर्चा सध्या रंगताना दिसत आहे. चॅम्पियन्स ट्रॉफी दरम्यान भारत पाकिस्तान यांच्यात रंगलेल्या सामन्याचा जल्लोष महिला क्रिकेटच्या मैदानात कितपत दिसणार हे पाहणे उत्सुकतेचे असेल.