ब्रेकिंग न्यूज
सावंतवाडी स्थानकाजवळ दुरांतो एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरले      इंडोनेशियात फटाक्यांच्या कारखान्याला आग, २३ ठार, ४३ जखमी      ताजमहालची सफाई करण्यापेक्षा योगींनी आपल्या पक्षातल्या लोकांची कलुषित मने स्वच्छ करावी : असदुद्दिन ओवैसी      महालक्ष्मी एक्स्प्रेस वर मध्यरात्री दरोडा, जेजुरी राजेवाडी स्टेशन येथील घटना, सिग्नल नादुरुस्त करून केली लूट      पर्यटनासाठी आलेल्या स्वित्झर्लंडच्या एका जोडप्याला उत्तर प्रदेशच्या फतेहपूर सीक्रीत एका टोळक्याने केली मारहाण      मुंबै बँकेकडून राधाकृष्ण विखे-पाटील यांना नियमबाह्य कर्ज? विखेंच्या डबघाईस आलेल्या कंपनीला 35 कोटींचं कर्ज.      मुंबई - छेडछाडीच्या भीतीने तरुणीने ट्रेनमधून उडी मारल्याचं प्रकरण, आरोपीला रेल्वे पोलिसांकडून अटक.      चंदू चव्हाण यांना तीन महिन्यांची शिक्षा, एलओसी ओलांडल्याप्रकरणी चंदू चव्हाण दोषी      अमिताभ बच्चन यांच्या अनधिकृत बांधकामास एमआरटीपीची नोटीस      गडचिरोलीतील 1036 गावांनी घेतला नक्षल गावबंदीचा ठराव
...

कुंबळेच्या आरोपांवर विराटने दिली अतिशय चलाखीने उत्तरे

नवी दिल्ली, दि. २३ (वृत्तसंस्था) - विराट कोहली याने कुंबळे आणि कोहली यांच्यातील वादावर मौन सोडले असून विराटने आजपासून सुरू होत असलेल्या वेस्ट इंडिज विरूद्धच्या सीरीजआधी म्हटले की, ड्रेसिंग रूममधील गोष्टींना मी कधीही सर्वांसमोर आणणार नाही. अनिल कुंबळे याच्या पत्राचा उल्लेख करत त्याने सांगितले की, आमच्यातील संबंध अस्थिर झाले होते. या सर्व वादावर विराट कोहली याने अतिशय चलाखीने उत्तरे दिली आहेत.

टीम इंडियाचे माजी कोच अनिल कुंबळे यांनी कोहलीसोबत असलेल्या मतभेदांमुळे कोच पदाचा राजीनामा दिला. कोहली यावर म्हणाला की, कुंबळे यांनी दिलेल्या राजीनाम्याचा मी सन्मान करतो. मी नेहमीच त्यांचा एक खेळाडू म्हणून सन्मान करतो. आपले विचार अनिल भाईने व्यक्त केले आणि त्यांनी पदाचा राजीनामा देण्याचा निर्णय घेतला. आम्ही त्यांच्या या निर्णयाचा सन्मान करू. ही अशी बाब आहे जी टुर्नामेंट नंतर घडली आहे.

पुढे कोहलीने जरा सावधगिरीने आपली स्पष्टीकरण दिले की, ड्रेसिंग रूममधील माहिती खूप गुप्त असते. मी कोणत्याही किंमतीवर ती सार्वजनिक करू शकत नाही. एक मात्र नक्की की, चॅम्पियन्स ट्रॉफी दरम्यान ११ प्रेस कॉन्सरन्स केल्या. आम्ही गेल्या चार-पाच वर्षात असे ठरवले आहे की, ड्रेसिंग रूममध्ये जे काही होते ते सार्वजनिक करायचे नाही. संपूर्ण टीमचा यावर विश्वास आहे.

तो पुढे म्हणाला की, कुंबळे यांच्या उपलब्धींचा नेहमीच मी आणि माझ्या टीमने एक खेळाडू म्हणून सन्मान केला आहे. तो सन्मान त्यांच्याकडून परत घेतला जाऊ शकत नाही. त्यांचा आम्ही सगळेच सन्मान करतो. विराट कोहली याच्या या सगळ्या बोलण्यावरून एक स्पष्ट होते की, त्याला वादावर काहीही बोलायचे नाही. ड्रेसिंग रूम आणि चेंजिंग रूमच्या गोष्टी सार्वजनिक करण्याचे कारण देत त्याने या वादाला बगल दिली आहे.