ब्रेकिंग न्यूज
सावंतवाडी स्थानकाजवळ दुरांतो एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरले      इंडोनेशियात फटाक्यांच्या कारखान्याला आग, २३ ठार, ४३ जखमी      ताजमहालची सफाई करण्यापेक्षा योगींनी आपल्या पक्षातल्या लोकांची कलुषित मने स्वच्छ करावी : असदुद्दिन ओवैसी      महालक्ष्मी एक्स्प्रेस वर मध्यरात्री दरोडा, जेजुरी राजेवाडी स्टेशन येथील घटना, सिग्नल नादुरुस्त करून केली लूट      पर्यटनासाठी आलेल्या स्वित्झर्लंडच्या एका जोडप्याला उत्तर प्रदेशच्या फतेहपूर सीक्रीत एका टोळक्याने केली मारहाण      मुंबै बँकेकडून राधाकृष्ण विखे-पाटील यांना नियमबाह्य कर्ज? विखेंच्या डबघाईस आलेल्या कंपनीला 35 कोटींचं कर्ज.      मुंबई - छेडछाडीच्या भीतीने तरुणीने ट्रेनमधून उडी मारल्याचं प्रकरण, आरोपीला रेल्वे पोलिसांकडून अटक.      चंदू चव्हाण यांना तीन महिन्यांची शिक्षा, एलओसी ओलांडल्याप्रकरणी चंदू चव्हाण दोषी      अमिताभ बच्चन यांच्या अनधिकृत बांधकामास एमआरटीपीची नोटीस      गडचिरोलीतील 1036 गावांनी घेतला नक्षल गावबंदीचा ठराव
...

पाकड्या क्रिकेटचाहत्याला भारतीयांनी झोडपले

लंडन, दि. २३ (वृत्तसंस्था) - पाकिस्तानने चॅम्पियन्स ट्रॉफीच्या फायनलमध्ये भारताला हरवले. पण हा सामना प्रेक्षकांसाठी लढाईपेक्षा कमी नव्हता. पाकिस्तानी प्रेक्षकांनी सामना संपल्यानंतर भारतीय खेळाडूंना डिवचले. सामना संपल्यावर ड्रेसिंग रूममध्ये जाताना भारतीय खेळाडूंना उद्देशून पाकिस्तानी प्रेक्षकांनी आक्षेपार्ह वर्तन केले.

भारताचा जलदगती गोलंदाज मोहम्मद शमी पाकिस्तानी प्रेक्षकाच्या या चिडवण्यावर चांगलाच भडकला. भारतीय खेळाडू ड्रेसिंग रूममध्ये जात असताना पाकिस्तानी प्रेक्षकांनी बाप कौन है? असा प्रश्न विचारला. हे ऐकून मोहम्मद शमी चांगलाच भडकला. शमीने त्या प्रेक्षकाकडे जायचा प्रयत्न केला पण धोनीने मध्यस्थी करत शमीला शांत केले. पण यानंतर आणखी एक व्हिडिओ समोर आला आहे. ज्यामध्ये दावा केला जात आहे की, ज्या पाकिस्तानी फॅनने असभ्य वर्तन केले त्या फॅनला मैदानाबाहेर भारतीय फॅन्सने चांगलाच चोप दिल्याचा दावा या व्हिडिओतून करण्यात येत आहे.