ब्रेकिंग न्यूज
उल्हासनगर : रेल्वे स्टेशनबाहेर वडापावच्या दुकान मालकाला जिवंत जाळण्याचा प्रयत्न, चंदरलाल रामरखियानी 100 % भाजले      पाकिस्तानात बेपत्ता झालेले दोन्ही मौलवी भारतात परतले      बेळगावात ड्राय डेच्या दिवशी दारु न दिल्याने पोलिसांची हॉटेल मॅनेजरला लाथा-बुक्क्यांनी मारहाण      नागपूरमध्ये राजू शेट्टी यांचे स्टेट बँक इंडियाच्या कार्यालयाबाहेर आंदोलन      पतीची हत्या करुन मृतदेह बीएमडब्ल्यू गाडीत लपवला, पत्नीविरोधात गुन्हा दाखल, पंजाबमधील घटना      उत्तरप्रदेशमध्ये बहुजन समाज पक्षाचे नेते मोहम्मद समी यांची भररस्त्यात हत्या      छत्तीसगडमधील दंतेवाडामधूल पाच नक्षलवाद्यांकडून मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा हस्तगत      महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांना फसवणारा, जनतेला गाजर दाखवणारा अर्थसंकल्पः जयंत पाटील      जळगाव : शहरापासून जवळच असलेल्या भादली गावात मध्यरात्री एका कुटुंबातील चौघांची चोरटयांनी हत्या केली.      मुंबईने गमावला मतदानाचा अधिकार, ईशान्य भारतातील राज्यांना मिळाला BCCI मध्ये मतदानाचा हक्क
...

कुंबळेंच्या ‘अधिकारशाही’मुळे हैराण झाले होते खेळाडू

नवी दिल्ली, दि. २४ (वृत्तसंस्था) - टीम इंडियाच्या प्रशिक्षकपदावरुन भारताचे माजी क्रिकेटपटू अनिल कुंबळे पायउतार झाल्यापासून भारतीय क्रिकेटमध्ये नव्या वादळाची सुरुवात झाली असून रोज नवनवीन धक्कादायक बातम्या कुंबळे आणि कर्णधार विराट कोहली यांच्यातील कथित वादाबद्दल समोर येत आहेत. या संपूर्ण वादामध्ये आतापर्यंत ज्या गोष्टी समोर आल्यात त्यामध्ये कुंबळे नायक तर, कोहली खलनायक ठरला आहे. अनिल कुंबळे चांगले प्रशिक्षक होते तर, टीम इंडियाचे सिनियर खेळाडू बेशिस्त आहेत अशी प्रतिमा माध्यमांनी तयार केली आहे.

पण आता खेळाडूंची बाजू सुद्धा समोर आली असून ड्रेसिंगरुममध्ये वर्चस्व, अधिकारशाही गाजवण्याचा अनिल कुंबळे यांचा स्वभाव खेळाडूंना खटकत होता. त्यांच्यात आणि कोहलीमध्ये संघ निवडीवरुन मतभेद व्हायचे असे वृत्त टाइम्स ऑफ इंडियाने टीम इंडियाच्या जवळच्या सूत्रांच्या हवाल्याने दिले आहे. आपल्या पसंतीचा संघ हा प्रत्येक कर्णधाराला हवा असतो. सौरव, राहुल, धोनी आणि आता विराटही त्याला अपवाद नाही. प्रशिक्षकाकडे आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळणा-या क्रिकेटपटूला कसे हाताळण्याचे त्याचे कौशल्य असावे लागते.

पण कुंबळे खेळाडूंशी संवाद साधताना यांच्यातला कठोर प्रशिक्षक जागा व्हायचा. खेळाडूंना हाताळण्याची कुंबळे यांची पद्धत कोहलीला अजिबात पटत नव्हती. कोहली आणि क्रिकेट सल्लागार समितीमध्ये चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धा सुरु असताना चार तासांची बैठक झाली. कोहलीने या बैठकीत त्याला वाटणा-या चिंता, कुंबळे यांचे काय चुकते आहे ते सर्व त्याने सल्लागार समितीला सांगितले. संघातील अनेक खेळाडूंना कुंबळे यांची एकधिकारशाही खटकत होती. आयपीएलमध्ये त्यांच्यासोबत काम केलेल्या काही खेळाडूंनी कुंबळेंशी जुळवून घेणे कठिण असल्याचे म्हटले होते. मागच्यावर्षी वेस्ट इंडिज दौ-यापासून कुंबळे आणि कोहली यांच्यात मतभेदाला सुरुवात झाली. आपण नाही समोरचा चुकतो आहे या विचारसरणीमुळे मतभेद जास्त वाढले.