ब्रेकिंग न्यूज
सावंतवाडी स्थानकाजवळ दुरांतो एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरले      इंडोनेशियात फटाक्यांच्या कारखान्याला आग, २३ ठार, ४३ जखमी      ताजमहालची सफाई करण्यापेक्षा योगींनी आपल्या पक्षातल्या लोकांची कलुषित मने स्वच्छ करावी : असदुद्दिन ओवैसी      महालक्ष्मी एक्स्प्रेस वर मध्यरात्री दरोडा, जेजुरी राजेवाडी स्टेशन येथील घटना, सिग्नल नादुरुस्त करून केली लूट      पर्यटनासाठी आलेल्या स्वित्झर्लंडच्या एका जोडप्याला उत्तर प्रदेशच्या फतेहपूर सीक्रीत एका टोळक्याने केली मारहाण      मुंबै बँकेकडून राधाकृष्ण विखे-पाटील यांना नियमबाह्य कर्ज? विखेंच्या डबघाईस आलेल्या कंपनीला 35 कोटींचं कर्ज.      मुंबई - छेडछाडीच्या भीतीने तरुणीने ट्रेनमधून उडी मारल्याचं प्रकरण, आरोपीला रेल्वे पोलिसांकडून अटक.      चंदू चव्हाण यांना तीन महिन्यांची शिक्षा, एलओसी ओलांडल्याप्रकरणी चंदू चव्हाण दोषी      अमिताभ बच्चन यांच्या अनधिकृत बांधकामास एमआरटीपीची नोटीस      गडचिरोलीतील 1036 गावांनी घेतला नक्षल गावबंदीचा ठराव
...

विंडीजविरुद्धच्या सामन्यात चॅम्पियन्स ट्रॉफीची जर्सी घालून उतरला युवराज

नवी दिल्ली, दि. २६ (वृत्तसंस्था) - क्रिकेट विश्वात आक्रमक फलंदाजीसाठी टीम इंडियाचा डावखुरा फलंदाज युवराज सिंग हा ओळखला जातो. युवराज सिंगसोबत वेस्ट इंडिजविरुद्धच्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात एक असा प्रसंग घडला आहे, की ज्यामुळे सगळ्यांनाच हसू येते आहे.

वेस्ट इंडिजविरुद्धच्या सामन्यात युवराज सिंग हार्दिक पांड्या बाद झाल्यावर फलंदाजीसाठी मैदानात आला. युवराज सिंगने घातलेली जर्सी पाहून यावेळी अनेकांना हसू आवरता आले नाही. कारण युवराज सिंग चक्क नुकत्याच संपलेल्या चॅम्पियन्स ट्रॉफीची जर्सी घालून मैदानात उतरला होता. नव्या दौऱ्यावर जाताना संघ व्यवस्थापन खेळाडूंना नवी जर्सी देते. त्यामुळे खेळाडू नव्या दौऱ्यावर नवी जर्सी परिधान करुन मैदानावर उतरतात. पण यावेळी चॅम्पियन्स ट्रॉफीचा लोगो युवराज सिंगच्या जर्सीवर दिसत होता. त्यामुळे युवराज चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी देण्यात आलेली जर्सी परिधान करुन मैदानात उतरल्याचे अनेकांच्या लक्षात आले. यामुळे अनेकांना हसू आवरणे अवघड जात होते.