ब्रेकिंग न्यूज
सावंतवाडी स्थानकाजवळ दुरांतो एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरले      इंडोनेशियात फटाक्यांच्या कारखान्याला आग, २३ ठार, ४३ जखमी      ताजमहालची सफाई करण्यापेक्षा योगींनी आपल्या पक्षातल्या लोकांची कलुषित मने स्वच्छ करावी : असदुद्दिन ओवैसी      महालक्ष्मी एक्स्प्रेस वर मध्यरात्री दरोडा, जेजुरी राजेवाडी स्टेशन येथील घटना, सिग्नल नादुरुस्त करून केली लूट      पर्यटनासाठी आलेल्या स्वित्झर्लंडच्या एका जोडप्याला उत्तर प्रदेशच्या फतेहपूर सीक्रीत एका टोळक्याने केली मारहाण      मुंबै बँकेकडून राधाकृष्ण विखे-पाटील यांना नियमबाह्य कर्ज? विखेंच्या डबघाईस आलेल्या कंपनीला 35 कोटींचं कर्ज.      मुंबई - छेडछाडीच्या भीतीने तरुणीने ट्रेनमधून उडी मारल्याचं प्रकरण, आरोपीला रेल्वे पोलिसांकडून अटक.      चंदू चव्हाण यांना तीन महिन्यांची शिक्षा, एलओसी ओलांडल्याप्रकरणी चंदू चव्हाण दोषी      अमिताभ बच्चन यांच्या अनधिकृत बांधकामास एमआरटीपीची नोटीस      गडचिरोलीतील 1036 गावांनी घेतला नक्षल गावबंदीचा ठराव
...

कुलदीपमुळे पडली कुंबळे-विराटमध्ये वादाची ठिणगी

मुंूई, दि. २७ - टीम इंडियाचे माजी कोच अनिल कुंबळे आणि कर्णधार विराट कोहली यांच्यातील भांडणाची सुरूवात कुलदीप यादवमुळे झाल्याचे म्हटले जात आहे. या वर्षी मार्चमध्ये ऑस्ट्रेलियाच्या भारत दौऱ्यात कोच आणि कप्तान यांच्या वाद निर्माण झाला होता. तिसऱ्या टेस्टसाठी कुंबळेला कुलदीप यादवला टीममध्ये सामील करायचे होते. पण कोहलीने याला साफ शब्दांत नकार दिला होता. टीम इंडिया या मॅचमध्ये कुलदीपशिवाय उतरली आणि मॅच ड्रॉ झाली होती.

कुंबळेने यानंतर धर्मशाला येथे आपला हट्ट कायम राखत संघात कुलदीपला घेतले. त्यावेळी विराटला कुलदीपला घेऊन मैदानात उतरावे लागले होते. भारताने ही टेस्ट जिंकली. त्यात कुलदीपने चार विकेट घेतल्या होत्या. कुंबळेचा हा अनुभव होता. पण विराट याला आपला पराभव समजून मनात ठेवून बसला. आतल्या आत दोघांमध्ये खूप अंतर वाढत गेले. चॅम्पियन्स ट्रॉफीनंतर हा तणाव खूप वाढला आणि कुंबळेने वेस्ट इंडिजला जाण्यापूर्वी आपल्या पदाचा राजीनामा दिला.

वेस्ट इंडिजविरूद्ध निळी जर्सी परिधान करण्याची संधी २२ वर्षाचा चायनामन कुलदीप यादवला मिळाली. पहिल्या सामन्यात पावसामुळे गोलंदाजीची संधी मिळाली नाही. पण दुसऱ्या सामन्यात त्याने आपली फिरकी चांगली चालवली. या वर्षी मार्चमध्ये धर्मशालामध्ये ऑस्ट्रेलियाविरूद्ध टेस्टमध्ये आपल्या आंतरराष्ट्रीय करीअरची सुरूवात करणाऱ्या कुलदीपने पहिल्या डावात विकेट घेऊन आपला प्रभाव सोडला होता.